शहरात 13 व 14 ऑगस्ट रोजी पाणी परिषद, एक हजार तज्ञांची उपस्थिती राहणार...!

 0
शहरात 13 व 14 ऑगस्ट रोजी पाणी परिषद, एक हजार तज्ञांची उपस्थिती राहणार...!

शहरात 13 आणि 14 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय पाणी परिषद, एक हजार तज्ञांची उपस्थित राहणार...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.9(डि-24 न्यूज) ही मराठवाडाची राजधानी असून नवनवीन तंत्रज्ञानाचे वापरात या शहराने पुढाकार घ्यावे, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची या संकल्पनेतून शहरातील आंतरराष्ट्रीय सत्राची पाणी परिषदाचे आयोजन केले जाणार आहे.

दिनांक 13 आणि 14 ऑगस्ट रोजी आयोजित केली जाणारी सदरील परिषदेची पूर्वतयारी म्हणून आज स्मार्ट सिटी कार्यालयात जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक बैठक संपन्न झाली.

 सदरील परिषदेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणीपुरवठा, पाण्याचा पुनर्वापर, ड्रेनेजचे पाण्याचे नियोजन व पाण्याचे स्रोताचे पुनरुज्जीवन या विषयावर सक्सेस स्टोरीज याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील पुढच्या 30 वर्षासाठी पाण्याची काय व्यवस्था राहणार आहे याच्यावर पण चर्चा केली जाणार आहे. 

यावेळी प्रशासक म्हणाले की सदरील पाणी परिषदेच्या उद्देश अजून एक असा आहे की सध्या स्थितीत पाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करणारे तरुण अभियंता आणि भविष्यात नवीन रुजू होणारे अभियंता यांच्यासाठी पण सदरील परिषद पथदर्शी ठरतील. याशिवाय अभियंत्यांच्या तरुण पिढीचा पाणीपुरवठात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराबाबत ज्ञानात भर पडेल, ते म्हणाले.

 सदरील परिषद प्रायोजक्त तत्त्वावर एमजीएमच्या रुक्मिणी हॉल येथे दिनांक 13 आणि 14 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. परिषदेच्या यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी यांची विविध बाबींसाठी समिती आणि उपसमित्या निर्माण करण्यात आली आहे.

 पाण्याचे नियोजन बाबत सदरील परिषदेत स्टॉल्स देखील लावण्यात येणार आहे. या परिषदेत पाणी नियोजनाशी निगडीत जवळपास एक हजार तज्ञांची उपस्थिती अपेक्षित आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow