शाळेची पहीली घंटा 15 जूनला वाजणार, विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार...!

 0
शाळेची पहीली घंटा 15 जूनला वाजणार, विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार...!

शाळेची पहीली घंटा 15 जूनला वाजणार, विदर्भातील शाळा 22 जूनला सुरू होणार...!

शिक्षण संचालक पुणे यांचे परिपत्रक 

पुणे, दि.9(डि-24 न्यूज)- महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक वर्ष 2026-27 हे 15 जून 2026 पासून सुरू होणार आहे. उन्हाचा पारा जास्त असल्याने विदर्भातील शाळा 22 जूनला सुरू होईल असे परिपत्रक आज शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉ.महेश पालकर, पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक संचालनालय पुणे, शरद गोसावी यांनी काढले आहेत.

परिपत्रकात म्हटले आहे संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2026 ची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष 2026-27 सुरू करणेबाबत संदर्भ क्रं.2 अन्वये राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक 15 जूनपासून सुरू करण्याबाबत कळविण्यात आले होते.

विदर्भात तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी व नियमित शाळा सुरू करण्याबाबत पेटीशन दाखल झाले आहे. त्याअनुषंगाने कळविण्यात येते की अद्यापही विदर्भातील तापमान हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सोमवार दिनांक 22 जून 2026 ते 30 जून 2026 या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात नियमित वेळेत भरतील. 

उर्वरित राज्यात मात्र शाळा सोमवार दिनांक 15 जून 2026 पासून नियमित वेळेत सुरू होतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आदेश शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक, जिल्हा परिषद यांना दिले

आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow