शिर धडावेगळे करुन खून करणाऱ्या आरोपिला 24 तासात ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

 0
शिर धडावेगळे करुन खून करणाऱ्या आरोपिला 24 तासात ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद

शिर धडावेगळे करुन खून करणाऱ्या आरोपिला 24 तासात ग्रामीण पोलिसांनी पकडले....

पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांची माहिती...

पिंपळगाव पांढरी शेत शिवारात शरीरापासुन डोके वेगळे करुन खुन करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा यांनी 24 तासात केले जेरबंद....

छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) दिनांक संप्टेंबर रोजी सांयकाळी संभाजीनगर ते सोलापुर NH-52 हायवेलगत पिंपळगावपांढरी शेत शिवारात शेत गट नं. 165 मध्ये एक शरीरापासुन डोके वेगळे केलेले मानवी मृतदेह आढळुन आला अशा माहितीवरुन सदर घटणास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. सिध्देश्वर भोरे, स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटणास्थळाची पाहणी केली असता एक पुरष जातीचे शरीरापासुन डोके कापून वेगळे करुन त्याची क्रुर हत्याकरुन त्याठिकाणी टाकुन दिले असल्याचे आढळुन आले होते. नमुद अनोळखी मृतदेहाबाबत माहिती घेऊन त्याची ओळख पटवली असता हा मृतदेह राजेश विजय कापसे रा. विजयनगर गारखेडा छत्रपती संभाजीनगर याचे असल्याचे निष्पन्न केले. नमुद मृतक राजेश विजय कापसे रा. विजयनगर गारखेडा छ. संभाजीनगर हा बेपत्ता झाल्या बाबत पोलीस ठाणे पुंडलीकनगर छत्रपती संभाजीनगर शहर येथे मिसींग क्र.86/2024 दिनांक-10/9/2024 अन्वये तो दिनांक-8/9/2024 पासुन बेपत्ता असल्याने मिसिंग मयत राजेश कापसे याची बहीण नामे रेखा जालींदर सिरसाठ हिने नोंद केलेली होती. सदर घटनेनुसार पोलीस ठाणे करमाड येथे फिर्यादी नामे जगदीश विजय कापसे रा. विजयनगर गारखेडा परीसर छत्रपती संभाजीनगर याने दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.न.372/2024 कलम 103 (1), 238, भा. न्या.सं. नुसार गुन्हा करण्यात आला.

सदर ठिकाणी पोलीस अधीक्षक श्री. डॉ. विनयकुमार राठोड यांनी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा, व करमाड पोलीस ठाणे येथील अधिकारी यांना गुन्हा उघडकीस आणण्या व तपासा बाबत मार्गदर्शन केले. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी श्री. सतिष वाघ यांचे नेतृत्वाखाली पोलीस ठाणे करमाड व स्थानिक गुन्हे शाखा येथील एकुण 5 पथके नेमले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. सुधीर मोटे, पवन इंगळे व पोलीस अमलदार यांनी तपासास सुरवात करुन, मृतकाची संपूर्ण माहिती घेऊन, मृतकाचे मित्र, जाण्या येण्याच्या जागा, व्यवसाय कामधंदा करण्याच्या जागा, नातेवाईक यांची कसोशीने चौकशी केली. मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन मयत राजेश कापसे याचे दत्ता अमृतराव सुरवसे रा. विजयनगर गारखेडा परीसर छत्रपती संभाजीनगर याचेसोबत काही दिवसापर्वी वाद झाला असल्याचे माहिती मिळाली. त्यावरुन तसेच घटनेच्या दिवशी दत्ता सुरवसे याचे सोबत ईसम नामे संतोष उधवराव जगताप रा. शिवनेरी कॉलनी गारखेडा छत्रपती संभाजीनगर हा असल्याचे माहित पडले.

त्यावरुन ईसम नामे संतोष उद्धवराव जगताप यास ताब्यात घेऊन त्याची सखोल विचारपुस केली.

चौकशीअंती त्या दोघांनी राजेश कापसे याला दत्ता सुरवसे याचे सोबत वाद असल्याने धारदार चाकुने गळा कापुन मारले आहे असे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील ईतर आरोपी नामे दत्ता अमृतराव सुरवसे याचा शोध व गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, डॉ विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग, छत्रपती संभाजीनगर श्री. सिध्देश्वर भोरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सतीष वाघ, सपोनि.प्रताप नवघरे करमाड, स्था.गु.शाखा, स.पो.नि. सुधीर मोटे, पवन इंगळे, पो.उपनि. दादाराव बनसोडे, रामेश्वर ढाकणे, स्था.गु.शाखेचे पोलीस अंमलदार-स. फौ. थोटे, पोहेकाँ / संजय घुगे, श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, रवि लोखंडे, नरेंद्र खंदारे, संतोष पाटील, अशोक वाघ, योगेश तरमाळे, चालक संजय तांदळे पो.स्टे. करमाड पोहेकाँ / शिवाजी मदेवाड, पोना. गित्ते, सुनिल गोरे, दादा पवार, संजय जगताप, नागलोत

, यांनी केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow