शिवशाही बस जळून खाक, चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचा वाचला जीव
 
                                शिवशाही बस जळून खाक, चालक वाहकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचा वाचला जीव
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) नाशिकहून औरंगाबाद कडे येणाऱ्या शिवशाही बसला 20KM च्या अंतरावर चितेगाव जवळ अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली आहे. चालक चौधरी, वाहक आर ओ खंडागळे यांच्या सतर्कतेमुळे 35 जणांचे प्राण वाचले आहे. अचानक समोरून आग वाढत असल्याने चालकाने सर्व प्रवाशांना तात्काळ बाहेर सुखरूप काढले.
गाडी नंबर MH-09,FL-O477 आहे.
हि शिवशाही बस सेंट्रल बस स्थानकाची आहे. नाशिक येथून औरंगाबाद कडे येताना अचानक हि दुर्घटना घडल्याने खळबळ उडाली. प्रवाशांना खाली उतरवले त्यानंतर बसने पेट घेतला. आगीत सर्व बस जळून खाक झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली बस जळत असताना यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. दुसऱ्या बसने प्रवाशांना पाठवण्यात आले आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर संबंधित पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आगीचे कारण काय, घटना कशी घडली याबाबत एसटी महामंडळाच्या वतीने चौकशी समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर कार्यवाही केली जाईल अशी माहिती डि-24 न्यूजला सेंट्रल बस स्थानकाचे आगारप्रमुख साखरे यांनी दिली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            