शिवसेना अक्रामक, क्रांतीचौकात जाळला बांगलादेशचा राष्ट्रध्वज...!
क्रांतीचौकात जाळला बांगलादेशचा राष्ट्रध्वज, उबाठाने केले धरणे आंदोलन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत असल्याने हे हल्ले थांबावे व तेथे शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून निषेधार्थ आज सकाळी 10.30 वाजता उबाठा(शिवसेना उध्दव ठाकरे) गटाच्या वतीने शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी "करु नका हिंदू द्वेष..शांत ठेवा बांग्लादेश..
इस्कॉन मानवतावादी, नाही दहशतवादी..
बांग्लादेशी हिंदूओ पर, हमले बंद करो..
बांग्लादेशी हिंदू के सन्मान में, शिवसेना मैदान में..अशी नारेबाजी करत अक्रामक होत शिवसैनिकांनी बांगलादेशचा राष्ट्रध्वज जाळला.
जोरदार घोषणा देत आज क्रांती चौकात बांग्लादेशात हिंदू समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्याय, अत्याचार व दडपशाही विरोधात तीव्र धरणे आंदोलन केले. भारतीय ध्वज तिरंग्याचा अपमान करणाऱ्या धर्मद्वेषी बांग्लादेशींना प्रत्युत्तर देत हिंदू समाजाचा सन्मान टिकावा यासाठी उपरोधिक बांग्लादेशाचा ध्वज जाळून आणि रस्त्यावर तुडवून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी समस्त हिंदू बांधव व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महानगरप्रमुख राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले, सुभाष पाटील, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, लक्ष्मीनारायण बखरिया, चंद्रकांत गवई, विजय वाघमारे, किशोर कच्छवहा, गिरीश चपळगावकर, शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक राजू शिंदे, दिग्विजय शेरखाने, गोपाल कुलकर्णी, गिरजाराम हाळनोर, सचिन तायडे, उपशहर प्रमुख प्रमोद ठेंगडे, नितिन पवार, अजय चोपडे, संजय हरणे, जयसिंग होलिये, प्रकाश कमलानी, विष्णु जाधव, गणेश लोखंडे, राजू जैस्वाल, बाबासाहेब मोहिते, प्रदीप सोनवणे, गोकुळ मलके, नंदू लबडे, राज निळ, बापू पवार, रणजीत दाभाडे, सूर्यकांत कुलकर्णी, तालुकाप्रमुख शंकर ठोंबरे, संजय मोटे, मदन चौधरी, एकनाथ चौधरी, विशाल चौधरी, संजय कोरडे, किरण गणोरे, युवासेना सहसचिव धर्मराज दानवे, महिला आघाडी सहसंपर्क संघटक दुर्गा भाटी, जिल्हा संघटक आशाताई दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, मीना फसाटे, शहर संघटक वैशाली आरट, सुनिता औताडे, भागूआक्का शिरसाठ, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, अंजना गवई, सुजाता आंबेकर, प्रतिभा राजपूत, संध्या कोल्हे, अनिता लगर, लता शंकपाळ, रूपाली मुदंडा, रोहिणी काळे, कविता सुरळे, सानिका शर्मा, रोहिणी पिंपळे, दिपाली बोरसे, प्राप्ती वैष्णव, पल्लवी काकुळते, मीना खोतकर, जमुनाबाई ठाकूर, सुमित्रा डीकोडवार, गायत्री चव्हाण व मनीषा बिराजदार उपस्थित होते.
What's Your Reaction?