शेख सिकंदर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी, साडेपाच सेकंदात शिवराजला केले चितपट

 0
शेख सिकंदर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी, साडेपाच सेकंदात शिवराजला केले चितपट

शेख सिकंदर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी, 5.37 सेकंदात शिवराज राक्षेला केले चित्रपट... अभिनंदनाचा वर्षाव 

पुणे,दि.10(डि-24 न्यूज) मागच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत संधी हुकल्यानंतर तालमीत भक्कम मेहनत जिद्द व चिकाटी कायम ठेवत शेख सिकंदर याने 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला साडेपाच सेकंदात झोळी डावावर चितपट करत इतिहास रचला. सिकंदरच्या समर्थकांनी त्याला डोक्यावर घेत मैदानावर फेरी मारत जल्लोष केला.

प्रदीप दादा कंद व पुणे कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या मैदानात स्पर्धा संपन्न झाली.

महाराष्ट्र केसरी सिकंदरला थार गाडी व चांदीची गदा आणि शिवराज राक्षेला ट्रॅक्टर बक्षिस देण्यात आले.

सिकंदरचे पारडे जड होते पण शिवराज आव्हान देईल अशी अपेक्षा होती. वेगवान व अक्रामक कुस्ती खेळणा-या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही.

सिकंदरने झोळी डाव घेत काही सेकंदात शिवराजला खाली घेतले त्याच स्थितीत चितपट करुन विजेतेपद पटकावले यामुळे सर्व कुस्ती चाहत्यांनी जल्लोष केला. 

पारितोषिक देताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, मुरलीधर मोहोळ, स्वागताध्यक्ष, पुणे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सदस्य प्रदीप दादा कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथूरे यांच्या शुभहस्ते सिकंदरला थार गाडी व चांदीची गदा उपविजेता ट्रॅक्टरचा मानकरी ठरला.

माती विभागात झालेल्या लढतीत पहिल्या फेरीतच सिकंदरने संदीपवर ताबा मिळवत सलग 2 गुण घेत आणि 10 गुणांची वसूली करत तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळवत किताबी लढतीत प्रवेश मिळवला होता. शिवराज राक्षेने कमालीचा चपळपणा दाखवत हर्षद कोकाटेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

या स्पर्धेत माती विभागात 65 KG वजनगटात रोहन पाटील, कोल्हापूर, वि.वि.यश मगदूम, गडचिरोली, 74 KG- अनिल कचरे, पुणे, वि.वि.संदेश शिषमुळे, गडचिरोली, 70 KG- निखिल कदम, पुणे, वि.वि.अभिजित भोसले, सोलापूर, 61 KG अमोल वालगुडे, पुणे जिल्हा, वि.वि. भालचंद्र कुंभ, पुणे, 57 KG सौरभ इंगवे, सोलापूर, वि.वि.कृष्णा हरणावळ, पुणे, 86 KG विजय डोईफोडे, सातारा, वि.वि.ओंकार जाधवराव, पुणे.

गादी विभागात 61KG पवन डोन्हर, नाशिक, वि.वि.योगेश्वर तापकीर, पिंपरी चिंचवड, 70 KG विनायक गुरव कोल्हापूर, 57KG अतिश तोडकर, बीड, वि.वि.आकाश सलगर, सोलापूर, 74 KG शुभम थोरात, पुणे, वि.वि.राकेश तांबूलकर, कोल्हापूर.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow