शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उद्या शिवसेनेचा मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा...

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उद्या शिवसेनेचा मराठवाडाव्यापी हंबरडा मोर्चा...
पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकातून होणार सुरुवात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)-: सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या बाबतीत मुबलक नुकसान भरपाई न देणाऱ्या राज्य सरकार विरोधात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याचा हंबरडा मोर्चा आज शनिवार, 11 ऑक्टोंबर रोजी काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता क्रांती चौक येथून सुरू होणारा हा मोर्चा गुलमंडी चौक संभाजीनगर येथे विराट जाहिर सभेत रूपांतरित होणार आहे. तदनंतर शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने मराठवाडा विभागीय आयुक्त यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई, सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती, पिक विम्याचे निकष पूर्ववत करावे व घरे व पशुधनासाठी निकष शिथिल करून मदत द्या, या मागण्याचे निवेदन देण्यात येणार आहे.
यावेळी शिवसेना नेते अंबादास दानवे,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, आमदार कैलास पाटील, राहुल पाटील व प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
याप्रसंगी शेतकरी बांधवांनी व शिवसैनिकांनी विराट संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, बबनराव थोरात, परशुराम जाधव, रोहिदास चव्हाण, सुनील काटमोरे, उपनेते लक्ष्मणराव वडले, सचिन घायाळ, ज्योतीताई ठाकरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, भास्कर आंबेकर, महेश नळगे, गणेश वरेकर, उल्हास गीराम, संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, गंगाप्रसाद आनेराव, रवींद्र धर्मे, संदेश देशमुख, गोपू पाटील, ज्योतिबा खराटे, बबनराव बारसे, भुजंग पाटील, रणजीत पाटील व राजू वैद्य यांनी केले आहे.
What's Your Reaction?






