श्रीराम नवमी निमित्त भव्य वाहन रैलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले
 
                                श्रीराम नवमी निमित्त छत्रपती संभाजी नगर एकता समितीच्या भव्य वाहन रॅलीने वेधले शहर वासियांचे लक्ष...
जय श्रीरामच्या जयघोषाने दुमदुमले शहर...
औरंगाबाद, दि.17(डि-24 न्यूज) मर्यादा पुरुषोत्तम, प्रभु श्रीराम की जय.... सियावर रामचंद्र की जय...असा जयघोष करत आज श्रीराम नवमी निमित्त छत्रपती संभाजी नगर एकता समितीच्या वतीने भव्य वाहन रॅलीने आज (दि.१७) शहर वसियांचे लक्ष वेधले. खडकेश्वर येथील महादेव मंदिरापासून प्रारंभ करण्यात आलेल्या भव्य वाहन रॅली मध्ये तरुण श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला.
प्रारंभी खडकेश्र्वर महादेव मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा एकमुखाने म्हणण्यात आली. त्यानंतर प्रभू श्रीरामचंद्राचा जयघोष करत हि भव्य वाहन रॅली पारंपारिक वेशभूषेने खडकेश्वर महादेव मंदिर येथून सकाळी ९.३० वाजता भव्य वाहन रॅलीला सुरुवात होऊन हि वाहन रॅली औरंगपुरा मार्गे गुलमंडी, पैठणगेट, क्रांतिचौक, सेंट्रलनाका, आझाद चौक, जाऊन किराडपूरा येथील श्रीराम मंदिर येथे या वाहन रॅलीचा समारोप करण्यात आला. शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होती. पहिल्यांदाच श्रीराम नवमी निमित्त छत्रपती संभाजी नगर एकता समितीच्या वतीने या भव्य वाहन रॅलीचे आयोजन विशाल दाभाडे, सुभाष मोकरिया, उमेश खुणीवाल, चेतन जागडे, धीरज गुजर, मधुर चव्हाण, शंतनू उरेकर, राम फुलंब्रीकर ,शक्ती होलिये, नितीन यादव, स्वप्नील कोकणे, सोनू खरात ,चंदू सोसे, आयुष चुडीवाल, विक्की चौधरी, ईश्वर गौर, विशाल काकडे ,अभिजित गंगावणे, अज्जू खोतकर, गौरव ठाकूर सचिन अंभोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            