श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनिकेत निल्लावार यांची निवड...

श्री गणेश महासंघ उत्सव समिती 2025-2026 च्या अध्यक्षपदी अनिकेत निल्लावार यांची निवड...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.2(डि-24 न्यूज) - श्री गणेश महासंघ उत्सव समितीद्वारा दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी असून छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी (दि. 1) बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते अनिकेत निल्लावर यांची एकमताने निवड करण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी अनिकेत निल्लावार यांचे नांव माजी अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी सुचविले. यासाठी अनुमोदन माजी उपमहापौर राजू शिंदे, जगन्नाथ काळे, यांच्यासह शिवाजीराव कवडे, राजेश मेहता, तनसुख झांबड, डी एन पाटील, बबन नरवडे, हरीश शिंदे, अमोल झळके, विकी जाधव, ज्ञानेश्वर शेळके, सचिन अंभोरे यांनी दिले. बैठकीचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेश मेहता यांनी मानले. पुढील कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार नवनिर्वाचित अध्यक्ष अनिकेत निल्लावार यांना देण्यात आले असुन लवकरच सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
What's Your Reaction?






