संविधानातील अधिकारासह कर्तव्येही महत्वाची- दिनेश वकील
संविधानातील अधिकारासह कर्तव्येही महत्त्वाची : दिनेश वकील
स्कूल ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेस उपक्रमाचे उद्घाटन
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.7(डि-24 न्यूज): भारतीय संविधानात प्रत्येक व्यक्तीला मिळालेले अधिकार महत्त्वाचे आहेतच, मात्र कर्तव्ये सुद्धा तितकीच महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन स. भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विधिज्ञ दिनेश वकील यांनी शुक्रवारी केले.
भारतीय राज्य घटनेतील परिच्छेद 51 इ मधील विवीध तरतुदी बंधुत्व व एकात्मता आणि नागरिकांची प्रमुख अकरा कर्तव्ये या विषयावर सदरची स्कूल ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेस भविष्यात कार्यरत राहणार असुन समर्थनगरातील गांधी स्मारक निधी गांधी भवनात स्कूल ऑफ कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेस उपक्रमाचे भारतीय राज्य घटनेचे अभ्यासक आंतरराष्ट्रीय स्तरावरील लेखक डॉ. शेषराव चव्हाण यांनी संकल्पित केलेल्या या स्कूलचे उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, समाजात संविधानिक मूल्ये व तत्त्वाविषयी जाणीव जागृती व्हावी यासाठी सदरच्या उपक्रमाचे नियोजन आणि आयोजन डॉ. शेषराव चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली प्रा डॉ. मच्छिंद्र गोर्डे, प्रा.डॉ. राजेंद्र शेजुळ आणि आयोजक व अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले आहे.
संविधानाचा बचाव व त्या समोरील आव्हाने या विषयी उक्ती नाही तर प्रत्यक्ष कृती महत्त्वाची आहे, तसेच त्यासाठी संरचनात्मक व दूरदर्शी कार्यक्रमाची आखणी करावी लागेल व संविधान जनजागृती समाजातील शालेय स्तरापासून हाती घ्यावा लागेल असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपक्रमाचे संकल्पक डॉ.शेषराव चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन या उपक्रमाचे आयोजक अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केले तर आभार गांधी भवनचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विवीध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठी उपस्थिती दर्शविली होती.
What's Your Reaction?