सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री अब्दुल सत्तार

 0
सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री अब्दुल सत्तार

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा...

सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटीबद्ध- पालकमंत्री अब्दुल सत्तार

 छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.15(डि-24 न्यूज)- विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कटीबद्ध आहे. त्यासाठी साऱ्यांची साथ आवश्यक असून समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून आपण आपल्या प्रगतीचा वेग कायम राखू या,असे आवाहन राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्य सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांची उपस्थिती...

 स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास खासदार संदिपान भुमरे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, म.न.पा. आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रदीप पवार, उपायुक्त जगदिश मिनियार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

 प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावटीवर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले. 

 त्यानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थितांना उद्देशून शुभेच्छा संदेश दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना आणि देशाच्या सिमेचे रक्षण करतांना आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले.

रोजगार निर्मितीला चालना...

  पालकमंत्री सत्तार म्हणाले की, शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला, रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, बिडकीन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहे. 120 एकर जागेत हा प्रकल्प येत असून या जागेचे वाटप पत्रही त्या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे 900 जणांना थेट रोजगार मिळेल. शिवाय अन्य लहान उद्योगही त्यामुळे कार्यान्वित होतील. त्याचप्रमाणे टोयोटा-किर्लोस्कर प्रकल्पाची 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होते आहे. मोटार वाहन निर्मिती याठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामुळेही 8 हजार जणांना प्रत्यक्ष व 8 हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. एथर एनर्जी हा प्रकल्प दुचाकी निर्मितीचा प्रकल्प असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

उपेक्षित घटकांच्या विकासासाठी योजना...

 समाजातील सर्वच उपेक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाने अनेक पावले उचलली आहेत. महिलांच्या सक्षमिकरणासाठी ‘मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहीण’ ही योजना सुरु करण्यात आली. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब माता भगिनींना या योजनेमुळे दरमहा 1500 रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसाराला हातभार लागेल. जिल्ह्यात 5 लाख 32 हजार 769 इतक्या बहिणींचे नावे या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाले असून राज्यात आपला जिल्हा अग्रेसर आहे. आमच्या या बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा या योजनेअंतर्गतही जिल्ह्यातील 1 लाख 68 हजार 858 महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2318 रिक्तपदे विविध आस्थापनांनी नोंदविली असून 2227 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामुळे सहा महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल शिवाय त्यांना सहा महिन्याचे विद्यावेतनही मिळेल, असेही पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले.

अल्पसंख्याकांच्या विकासाला मिळेल चालना...

 पालकमंत्री सत्तार म्हणाले, शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करुन कार्यान्वित केले आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. परवा झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्यातील दुग्धविकासाला चालना देण्यासाठी शासनाने 328 कोटी 42 लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्या येणार असून तीन वर्षाच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या 19 जिल्ह्यात 13 हजार 400 दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोपयोगी निर्णय...

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानाच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ सुद्धा लाखो नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री सत्तार म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई व शबरी या तिन्ही योजनेचे मिळून 7 हजार 758 घरकुले पूर्ण करण्यात आली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आर्थिक 255.08 टक्के साध्य करण्यात आले. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत 1161 योजनांची कामे हाती घेण्यात आली असून ती प्रगती पथावर आहेत. 

पाणीपुरवठा, क्रीडांगण विकास, स्वच्छतेस प्राधान्य...

छत्रपती संभाजीनगर शहरवासियांसाठी नळाला 24 तास पाणी आता स्वप्न नव्हे तर वास्तव होणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून महापालिकेच्या हिश्श्याचा 822 कोटीचा निधी शासनाने दिला आहे. तसेच आमखास मैदान येथे आंतरराष्ट्रीयस्तराचे फुटबॉल स्टेडियम, गरवारे क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम साकारणार आहे. शहरातून जाणाऱ्या खाम नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पासाठी बक्षीस घोषित केले आहे. शहराला स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट करण्याचे दिशेने महानगरपालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्यात नागरिक सहभागही देत आहेत, याबाबत पालकमंत्री सत्तार यांनी समाधान व्य्क्त केले.

देशाच्या एकतेचे प्रतिक तिरंगा...

आपण सर्व हर घर तिरंगा या अभियानात सहभागी झालात त्याबद्दल आपले अभिनंदन. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात संपूर्ण देश एकसंघ भावनेने जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता विसरुन सहभागी होतो. विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचे एकमेव उदाहरण असल्याचेही पालकमंत्री सत्तार म्हणाले.

प्रशासनाच्या विविध उपक्रमांचे कौतुक...

पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनानेही जलसमृद्ध गाव अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत विहीर पुनर्भरणाची 570 कामे तर रेनवॉटर हार्वेस्टिंगची 167 कामे सुरु आहेत. वटवृक्ष लागवड अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 6 हजार 605 वटवृक्ष लागवड करण्यात आली आहे. या अभियानांची रुजूवात करुन पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाकांक्षी काम सुरु केले आहे. पाणी टंचाईवर मात करण्याचा विचार यामागे आहे. प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या या उपक्रमांला त्यांनी शुभेच्छा दिल्या. लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांची साथ असतेच. आपल्या समाजात एकोपा आणि शांतता कायम ठेवून आपल्या प्रगतीचा वेग राखता येईल. देशाची एकात्मता आणि शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.

  मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोहळ्यास आलेल्या स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना केले सन्मानित...

  

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय खांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक द्वारकादास भांगे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल तर नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकारित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विहित कालावधी पूर्ण केल्यामुळे विशेष सेवा पदक देवून गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक परविन यादव, पोलीस उपनिरिक्षक अशोक माने, दिपक पारधे, राधा लाटे, उत्तम नागरगोजे, दिलीप जाधव, अनिल नाणेकर, नारायण राठोड, भारत निकाळजे यांना गौरविण्यात आले. 

शिक्षण विभागाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल स्वराज्य अरुण मानधने, सारंग संतोष पवार, श्रेयस अजय निकम, यांना तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी राज्यस्तरीय यशाबद्दल अर्चित संतोष दखर, अर्यान सखाहरी नवले, अनुराग राजेंद्रकुमार पवार यांना गौरविण्यात आले. 

जिल्ह्यातील लघु उद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी शासनाकडून सन 2021 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या ॲटोमॅट इंडस्ट्रीज वाळूज व ओमकार इंडस्ट्रीज शेंद्रा या लघु उद्योजकांनाही गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवर एकूण 153 पदांची तलाठी पदभरती प्रक्रिया घेण्यात आली त्यापैकी 59 उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित 94 नियुक्ती आदेशांपैकी पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात 5 नियुक्ती आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले.

 श्रीमती प्रविणा कन्नड

कर यांनी सूत्रसंचलन केले.

English News 

Chhatrapati Sambhajinagar(Aurangabad),Aug 15 Chhatrapati Sambhajinagar district guardian minister Abdul Sattar on Thursday said that, Government is committed for the upliftment of all sections of the society through various welfare schemes. For this, the support of all is necessary and let us maintain the pace of our progress by maintaining harmony and peace in the society.

    Sattar was speaking on the occasion of hoisting national flag at premises of Divisional Commissioner office here on the occasion of 78 th independence day in presence of families of freedom fighters, martyrs among others.

 MP Sandipan Bhumre, Assembly member MLA Pradeep Jaiswal, MLA Sanjay Shirsat, former MP Chandrakant Khaire, former MP Imtiaz Jaleel, Divisional Commissioner Dilip Gawde, Municipal Corporation Commissioner G. Srikanth, Collector Dilip Swamy, Chief Executive Officer of Zilla Parishad Vikas Meena, Special Inspector General of Police Chhatrapati Sambhajinagar Circle Virendra Mishra, Commissioner of Police Pradeep Pawar among all officials of the administration, freedom fighters, families of martyred jawans, Social workers were also present.

In the beginning, the National Flag was hoisted by the Guardian Minister Sattar and saluted. National Anthem followed by State Anthem was performed by police band.

  Sattar addressed the audience with a greeting message. At the beginning of his speech, he saluted all the freedom fighters, martyrs and soldiers who sacrificed their lives while protecting the borders of the country.

   Sattar said that the government has taken many important steps for the development of the district. Therefore, development and employment generation will be boosted in our district and entire Marathwada.

For the empowerment of women, the scheme 'Mukhya Mantri: Majhi Ladki Bahin' was launched. This scheme is getting good response in the district. Due to this scheme, poor mothers and sisters will get 1500 rupees per month i.e. 18 thousand rupees per year. 

Sattar further said, the government has decided to establish Minority Research and Training Institute MARTI for the development of minority society. Also, a Minority Commissionerate has been established and made operational at Chhatrapati Sambhajinagar. 

The government has decided to convert the land of Khalsa in Marathwada into class two inam and temple land into class one. Stating that lakhs of citizens will also benefit from it.

For the residents of Chhatrapati Sambhajinagar, 24-hour tap water is now going to be a reality, not a dream. The work of the new water supply scheme is in progress and the government has given a fund of 822 crores for the municipal share,he added.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow