सिध्दार्थ महाविद्यालयात लोककवी अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदिन संपन्न

सिद्धार्थ महाविद्यालयात लोककवी अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिवस संपन्न...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)
सिद्धार्थ ग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय ,मिटमिटा येथे आज लोककवी अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिवस संपन्न झाला. याप्रसंगी घाटी हॉस्पिटलचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विलास भाऊ जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखेडे हे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना डॉ. मनोहर वानखेडे म्हणाले, लोककवी अण्णाभाऊ साठे हे एक समाज सुधारक लोककवी आणि लेखक होते. अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळेमध्ये गेले. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील अण्णाभाऊंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे महत्त्वपूर्ण योगदान मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी त्यांच्या पीएचडी च्या अभ्यासात हे त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना आपल्याला दिसून येतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोक माणसात रुजवण्याचे काम अण्णाभाऊ यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, व पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा लागत भागात अनेक ठिकाणी अण्णाभाऊंनी त्यावेळी लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सुद्धा सादर केले. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनावर आधारित अनेक चित्रपट सुद्धा प्रसारित झालेले आहे. वैजंता , टिळा लावते , मी रक्ताचा, डोंगरची मैना, मुरली मल्हारी, याची वारणेचा वाघ, अशी ही रस्त्याची तरा, फकीरा ह्या त्यांच्या लेखनावर मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्माण झालेले आहे.
या कार्यक्रमाचे संचलन श्री आसिफ शेगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा कल्पना कंकुटे यांनी मांडले या कार्यक्रमासाठी प्रा. पूजा साळवे, प्रा. कुलदीप जाधव, दीपक पाईकराव, रोहिणी देवकाते, श्रीमती अनिता काकरवल, श्री श्रीकांत पातोडे इत्यादी महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
What's Your Reaction?






