सुखना पुनर्जीवन अंतर्गत चिकलठाणा येथील पुला खालील नदीची सफाई सुरू

 0
सुखना पुनर्जीवन अंतर्गत चिकलठाणा येथील पुला खालील नदीची सफाई सुरू

सुखना पुनर्जीवन अंतर्गत चिकलठाणा येथील पुला खालील नदीची सफाई सुरू

छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)

खाम नदीच्या धरतीवर सुखना नदीच्या देखील पुनर्जीवन करायला पाहिजे यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सूचना दिल्या होता. याचबरोबर सदरील प्रकल्प जलद गतीने व्हावे यासाठी त्यांनी सुखना नदी पुनर्जीवन प्रकल्प या विषयावर बैठका देखील घेतल्या होत्या.

त्यांच्या संकल्पना नुसार सुखना नदी पुनजीवन प्रकल्प अंतर्गत चिकलठाणा आठवडी बाजार येथील पुलाखालील भागाची स्वच्छतेचे काम घनकचरा व्यवस्थापन या विभागाने विभाग प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पासून हाती घेतले आहे 

सदरील कामाची सुरुवात करण्यात आली असून याठिकाणी एक जेसीबी आणि एक पोकलेंडच्या मदतीने जवळपास एक किलोमीटर नदी पात्राची सफाई करण्यात येत आहे.

मागील काळात महानगरपालिकेने खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्प यशस्विरीत्या पूर्ण केला

आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow