सुलेमान खानच्या माॅब लिंचिंग प्रकरणी कठोर कार्यवाईची मागणी...

सुलेमान खान पठाण याच्या
मॉब लिंचिंग प्रकरणी कठोर कारवाईची काँग्रेसची मागण इंजिनिअर इफ्तेखार शेख, प्रदेश महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी (अल्पसंख्याक विभाग)
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)-
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी (अल्पसंख्याक विभाग) चे प्रदेश महासचिव इंजिनिअर इफ्तेखार शेख यांच्या तर्फे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष यांना उद्देशून विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी शेख युसूफ शहर अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी सोबत होते.
या निवेदनात मागणी करण्यात आली कि, जामनेर तालुका, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालूक्यातील छोटा बेटावट गावात 11 ऑगस्ट 2025 रोजी घडलेल्या सुलेमान रहीम खान पठाण (वय 21) याच्या मॉब लिंचिंगच्या घटनेशी संबंधित आहे. या घटनेत, सुलेमान याला काही व्यक्तींनी एका कॅफेमध्ये मुलीशी बोलताना पकडले, त्याला रस्त्यावर फिरवले, क्रूर मारहाण केली आणि शेवटी त्याच्या घरासमोर फेकले. या हल्ल्यात त्याच्या आई आणि बहिणीलाही मारहाण झाली. या क्रूर हल्ल्यामुळे सुलेमानच्या सर्व अवयवांना गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना धार्मिक द्वेषावर आधारित मॉब लिंचिंग असून, यामुळे अल्पसंख्याक समुदायात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असली, तरी ही कारवाई अपूरी आहे. या घटनेमागील संघटित गुन्हेगारी आणि राजकीय दबावाची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) नेमावे. दोषींवर कठोर कारवाई करून कायद्यानुसार योग्य शिक्षा द्यावी. या प्रकरणात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट (MCOCA) लागू करावा. खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकर न्याय मिळवावा. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, संरक्षण आणि न्याय द्यावा. जळगाव जिल्ह्यात पोलिस गस्त वाढवावी आणि सामाजिक सौहार्दासाठी कार्यक्रम आयोजित करावेत. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत:
या निवेदना द्वारे, इंजिनिअर इफ्तेखार शेख प्रदेश महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी (अल्पसंख्याक विभाग), शेख युसूफ शहर अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी यांनी प्रशासनाला या गंभीर प्रकरणात तातडीने कारवाई करून न्याय सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
या निवेदनाच्या वेळी शेख युसूफ शहर अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी, इब्राहिम पठाण प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग, शेख अथर अध्यक्ष इंटक काँग्रेस, मोहसीन खान प्रदेश महासचिव युवक काँग्रेस, सय्यद नदीम सौदागर सचिव औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटी, इंजिनीयर मोहसीन प्रदेश महासचिव युवक काँग्रेस , मुजफ्फर खान पठाण मा. अध्यक्ष युवक काँग्रेस, शेख शफिक सरचिटणीस युवक काँग्रेस, साजिद कुरेशी मराठवाडा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग, मोहम्मद झाकीर प्रदेश महासचिव राजीव गांधी पंचायत राज काँग्रेस, आमेर रफिक खान, सलमान खान उपाध्यक्ष औरंगाबाद पूर्व युवक काँग्रेस हे उपस्थित होते.
What's Your Reaction?






