सेवन हिल येथील अनधिकृत 17 झोपड्या जमिनदोस्त

 0
सेवन हिल येथील अनधिकृत 17 झोपड्या जमिनदोस्त

सेवन हिल्स येथील अनधिकृत झोपड्या कायमस्वरूपी हटवल्या

मुख्य रस्त्यावरील सुध्दा अतिक्रमणे हटविली जाणार- प्रशासक

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) सेवन हिल सिग्नल लगत मुख्य रस्त्यावरील एकूण अनधिकृत 17 झोपडी धारका विरुद्ध कारवाई करण्यात आली.

 महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागा मार्फत आज सकाळी गजानन महाराज मंदिर ते सेवन हिल्स कडे येणाऱ्या रस्त्यालगत डाव्या बाजूच्या एकूण 17 नागरिकांनी या रस्त्यावर पाच बाय पाच पाच बाय सात आठ बाय दहा या आकाराच्या 17 झोपड्या तयार करून या ठिकाणी विविध स्वरूपाचे अतिक्रमण केले होते. 

 सदरील अतिक्रमणधारक हे अनेक दिवसापासून या ठिकाणी वास्तव्यास होते.

 सुरुवातीला त्यांनी त्या ठिकाणी पाटे, वरवंटा ,लाकडापासून तयार होणारी खेळणीचा व्यवसाय करत होते.

 नंतर यांनी काही राजकीय लोकांना हाताशी धरून या ठिकाणी आपली निवास व्यवस्था सुद्धा केली यामुळे या ठिकाणी कचरा निर्माण होत होता. या रस्त्यावर वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या अतिक्रमणामुळे पायी जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. बऱ्याच वेळी या ठिकाणी दुर्घटना घडल्या होत्या याबाबत स्थानिक नागरिकांनी व स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यांना समजावून सांगितले की अशा पद्धतीने मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करू नये तरीदेखील हे कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट मनपा पथका समोर आरडाओरडा करून आत्महत्या करण्याच्या धमक्या देत होते.

 परंतु प्रशासक यांनी शहरातील विविध रस्त्यावरील अतिक्रमांचा वेळोवेळी आढावा घेतला. आढावा घेताना अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी आणि उप आयुक्त मंगेश देवरे यांच्यावर हे सर्व अतिक्रमण काढण्याची जबाबदारी देण्यात आली. या अनुषंगाने मान्य उपायुक्त मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 7 प्रसाद देशपांडे यांनी महिनाभरापूर्वी सर्व अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर अतिक्रमण धारकांनी या सूचनेचे पालन केल्याने प्रशासक यांच्या आदेशानुसार व मान्य पोलीस आयुक्त यांच्या विशेष पथकाच्या साह्याने आज या झोपड्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. 

आज सकाळी पथक कारवाई करण्यास गेले असता सुरुवातीस पथकाला विरोध करण्यात आला परंतु अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त मंगेश देवरे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी संमती अतिक्रमणधारकांशी चर्चा करून त्यांना समजावून सांगितले. या अगोदर सुद्धा या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली होती परंतु काही राजकीय लोकांनी या कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला होता. याबाबत माननीय प्रशासक यांनी संबंधित अतिक्रमण धारक व त्यांना मदत करणारे राजकीय लोकांना समजावून सांगितले होते. या अतिक्रमणामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन प्रसंगी अपघात झाले होते. संबंधित अतिक्रमणधारकांनी हे मान्य केले होते.

आज हे सर्व अतिक्रमण कायमस्वरूपी काढण्यात आले. काढताना त्यांचे झोपडीचे साहित्य संसार उपयोगी साहित्य काढण्यास मनपा पथकाने सहकार्य केले याबद्दल अतिक्रमण धारकांनी बदकाचे आभार मानले.

यासोबतच गजानन महाराज मंदिराजवळील पुस्तक व इतर साहित्य विक्री करणारे चार चाकी वाहनाचे अतिक्रमण व या ठिकाणी असणारे तीन नर्सरी धारकांचे अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले. गजानन महाराज मंदिर ते सेवन हिल या रस्त्यावरील डाव्या बाजूचे अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे रस्ता मोकळा झाला आहे यानंतर समोरील बाजूची अतिक्रमण काढण्यात येणार आहे नागरिकांनी आपल्या अतिक्रमण काढून घेऊन मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे तसेच यानंतर रस्त्यावरील अतिक्रमणे काढताना प्रशासनाच्या वतीने कोणतीही पूर्व सूचना देण्यात येणार नाही असेही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांचे मार्गदर्शनाखाली उपायुक्त मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग अधिकारी झोन क्रमांक 7 प्रसाद देशपांडे,अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद,सागर श्रेष्ठ,गायकवाड, पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, पुरुष व महिला पोलीस कर्मचारी मनपाचे मजूर जेसीबी चालक यांनी कारवाईत सहभाग घेतल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow