सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गांधी पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण...!
सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांचे आंदोलनाला पाठिंबा गांधी पुतळ्यावर लाक्षणिक उपोषण संपन्न..!!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)-नीट परीक्षेतील गैरप्रकारांची जबाबदारी म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्र्याने राजीनामा द्यावा व वारंवार पेपर फुटीचा जबाबदारी निश्चित करून, कोणतेही पेपर फुटणार नाहीत अशी व्यवस्था करा या प्रमुख मागण्यासाठी , प्रख्यात पर्यावरणवादी व शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक हे गेले 22 दिवसापासून दिल्ली येथे बेमुदत उपोषण करीत असतांना कोणताही संवाद - चर्चा न करता जबरदस्तीने हॉस्पिटल मध्ये हलविणे हा सरकारने सर्व ताळतंत्र व नैतिक मूल्ये पायदळी तुडविणारा प्रकार असून, त्या विरुद्ध शहरातील नागरिकव परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज गांधी पुतळ्या वर लाक्षणिक उपोषण केले.
देशातील तरुण पिढीच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या या अत्यंत संवेदनशील प्रश्नावर केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत आहे हे लोकशाही कार्यपद्धतीला मोठे आव्हान असल्याची नोंद करून, सरकारच्या या आडमुठ्या - लोकशाही विरोधी व संवेदनशून्य वर्तणुकीचा अनेक वक्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
सकाळी 9 वाजता लाक्षणिक उपोषणाची सुरुवात महात्मा गांधी यांचे पुतळ्यास प्रा. विजय पाथ्रीकर व प्रा. श्रीराम जाधव यांनी पुष्पहार घालून झाली.
यावेळी महात्मा गांधी मिशन चे कुलपती अंकुशराव कदम, युवा पत्रकार निरंजन टकले, खा.कल्याण काळे, शेतकरी नेते साथी अमर हबीब, कष्टकऱ्यांचे नेते साथी सुभाष लोमटे व प्रा. राम बाहेती, टेलिफोन कर्मचारी संघटनेचे साथी रंजन दाणी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष एड सय्यद अक्रम, प्रा जयदेव डोळे, ॲड.विष्णू ढोबळे,प्रा. मंगल खिंवसरा, प्रा.एच.एम.देसरडा, प्रा.सुभाष महेर,कॉ.भीमराव बनसोड, ॲड. वैशाली डोळस, आवेश भाई, ऍड.अभय टाकसाळ,मेराज सिद्दिकी, प्रा. वैजनाथ राठोड, कॉ. भगवान भोजने , इ. ची मार्गदर्शनपर भाषण झाली.
आजच्या लाक्षणिक उपोषणात कृषितज्ज्ञ मा. त्रिंबक पाथ्रीकर, साथी शेख खुर्रम, प्रा. गीता कोल्हटकर, साथी देविदास किर्तीशाही, साथी सर्जेराव जाधव, ॲड. सचिन गंडले, प्रा . प्रकाश शिरसाट, याहया खान सलीम पाशा, रत्नकला राठोड, सुनीता शिंदे, करुणा गंगावणे, वैशाली शिरसाट , तिलोत्तमा झाडे, इंद्रकुमार जेवरीकर , प्रा.ललिता गादगे, कॉ. श्रीकांत फोप्से, सरस्वती हरकळ , शकुंतला देसरडा, प्रा. प्रकाश दाणे, परशुराम वाखुरे, डॉ. मंजुश्री लांडगे, सिद्धार्थ बनसोड, कॉ. भास्कर लहाने, कॉ. मधुकर खिल्लारे इ. चा प्रमुख सहभाग होता.
या प्रकरणी राष्ट्रपतींनी तात्काळ हस्तक्षेप करावा म्हणून लाक्षणिक उपोषणानंतर विभागीय आयुक्तांमार्फत निवेदन दिले.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस ॲड. सुभाष सावंगीकर यांनी केले.
उपोषणाची सांगता, युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ गांधीवादी डॉ. कुमार सप्तर्षी ज्यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना एक मिनिट स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात
आली.
What's Your Reaction?