स्काॅर्पियोत व स्विफ्ट कारमध्ये धारदार हत्यार मिळाल्याने खळबळ, ग्रामीण पोलिसांनी 3 आरोपिंना केले अटक

दोन चारचाकी वाहनात धारदार हत्यार मिळाल्याने खळबळ, ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपिंना केले अटक
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.30(डि-24 न्यूज) शेकटा फाटा येथे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत स्काॅर्पियोत व स्विफ्ट डिझायर कारमध्ये धारदार हत्यार आढळली यात तीन आरोपिंना बिडकीन पोलिसांनी अटक केली आहे.
एक काळ्या रंगाचे स्काॅर्पियोत (MH-20, GY-2971) मध्ये एक पांढ-या रंगाची 5 इंच मुठ असलेला व त्यास 6.5 इंच लांबीचे व 1 इंच रुंदीचे धारदार पाते असलेला एकुण अंदाजे 11.5 इंच लांब चाकू मिळून आला. एक अंदाजे 31 इंच लांबीचा व अंदाजे 2 इंच जाडीचा दांडा ज्याच्या एका बाजूला पकडण्यासाठी मुठ व रबरी ग्रिप असलेला दांडा. एक पांढ-या रंगाची स्विफ्ट कार क्रं.MH-47, Q-1570 मध्ये एक 20 इंच लांबीची गुप्ती त्यास उघडून बघितले असता त्यात 10 से.मि.रुंदी असलेला धारदार पाते व 14 इंच काळ्या व पांढ-या रंगाची मुठ असलेली गुप्ती , एक 3 फुट लांबीची व अंदाजे 2 इंच जाडीचा लाकडी दांडा असा एकूण 802800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अरुण रतन चव्हाण, वय 22, राहणार बन्नीतांडा, तालुका पैठण, तुषार दिलिप राठोड, वय 21, राहणार कचनेर तांडा,
क्र.एक, हमु न्यायनगर, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), पवन गोरख गोरडे, वय 24, राहणार बाळानगर, ता.पैठण, हमु N-4, हनुमान नगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) यांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.
पोलिस स्टेशन बिडकीन गुरन 609/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह कलम 37(1)(3)/135 मपोकाॅ सह कलम 184,185,51/177 मोवाका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक निलेश शेळके, ठाणेदार बिडकीन यांचे नेतृत्वात सपोनि शेळके, पोउपनि माने, सफौ सोकटकर, विष्णू गायकवाड, हनुमान धनवे, योगेश वाघमोडे, शेखर जाधव यांनी केली आहे.
What's Your Reaction?






