स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार - बाबासाहेब पाटील
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार - बाबासाहेब पाटील
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज)- राज्यात लवकरच जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले.
छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्याचे संपर्कमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
हा जिल्हा नेहमी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी उभा राहिला. जे कार्यकर्ते पक्षापासून दुरावले होते त्यांच्या सह विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रवेश करत असताना पक्षाची ताकत वाढली आहे. आगामी निवडणुकीत जुने नवे असा भेदभाव न करता जो निवडून येईल त्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल असे प्रस्तावनेत आमदार तथा जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सांगितले.
याप्रसंगी आमदार विक्रम काळे, माजी आमदार नितीन पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख, डॉ.गफार कादरी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अहेमद अली, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, संतोष कोल्हे, दत्ता भांगे, सुभाष सोनवणे, अनुराग शिंदे, अखिल शेख, अप्पासाहेब पाटील, सुरेश जाधव, गजानन फुलारे, ठगणराव भागवत, विकास दांडगे, मयुर सोनवणे, कय्यूम अहेमद, भारत गरड, अजिज खान गणी खान, मोईन इनामदार, अबुबकर अमोदी, फजलुल्लाह खान, फेरोज खान, अश्रफ पठाण आदी उपस्थित होते.
आमदार सतीश चव्हाण यांनी डाॅक्टर कादरींना टोमणा मारल्याने हशा पिकला...
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवीन संपर्क मंत्री तथा राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे आज शहराच्या दौऱ्यावर आले होते. पहील्यांदाच दौरा असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना डॉ.गफार कादरी यांनी दिलेल्या कार्यालयात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना आमदार तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांचा भाषणात तोल सुटला डॉ.कादरींना सांगितले आपण एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष होते. राष्ट्रवादीत आले आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीपर्यंत थांबतिल का नाही ते सांगा यावेळी हशा पिकला... डॉ.कादरींनी मान हलवून सांगितले राष्ट्रवादी सोडणार नाही. तेव्हा पुढचे भाषण त्यांनी सुरू केले. सतीश चव्हाण यांनी आपल्या भाषणात इच्छूकांना विश्वास मिळवून दिला की आपला जिल्ह्यात एकही आमदार नाही परंतु गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते पक्षात आल्याने पक्ष संघटना मजबूत झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुती होईल अथवा होणार नाही चिंता करू नका पक्ष उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकत लावणार आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती निवडणुकीत एक नंबर पक्ष निवडून येईल. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीविना बनणार नाही. असे त्यांनी संपर्कमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समोर ठणकावून सांगितले.
पक्षात शिस्त ठेवा, राष्ट्रवादी मुस्लीम समाजासोबत - आमदार विक्रम काळे
सत्तेत महायुती असलो तरी राष्ट्रवादी पक्ष हा फुले -शाहु आंबेडकरी यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय घेत आहे. बीड जिल्ह्यात धार्मिक स्थळावर झालेल्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. त्या जिल्ह्याचे अजित पवार पालकमंत्री असल्याने तात्काळ कारवाई करत दोषींवर युएपिए अंतर्गत कारवाई केली. जेव्हा जेव्हा अल्पसंख्याक समाजावर संकट आली राष्ट्रवादी धावून जाते. एका व्यक्तीने काही वक्तव्य केले त्याचे पक्षाने खंडन केले. राष्ट्रवादी नेहमी सर्व समाजासोबत अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी निर्णय घेत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे. युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील परंतु सामान्य जनतेशी नाळ जोडून प्रश्न सोडविण्यासाठी जनतेमध्ये जावे. पक्षात शिस्तीचे पालन करावे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवावा. पदाधिकारी व तालूका अध्यक्ष यांना मेळावे व विविध कार्यक्रमात व्यासपीठावर स्थान मिळावे. असा टोला राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी लगावला. पक्षाचे संपर्कमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
What's Your Reaction?