स्वामित्व योजनेअंतर्गत मिळकतधारकांना उद्या सनद वाटप, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार संवाद

स्वामित्व योजनेअंतर्गत मिळकतधारकांना उद्या
सनद वाटप; पंतप्रधान साधणार ऑनलाईन संवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.26(डि-24 न्यूज):- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार दि.27 रोजी देशातील स्वामित्व मिळकतधारकांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत. दुपारी साडेबारा वा. हा कार्यक्रम होणार असून यानिमित्त जिल्हास्तरावर इतर मागासवर्ग व बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वा. नियोजन सभागृहात सनद वाटप होणार आहे. जिल्ह्यात स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत 732 गावांच्या 1 लाख 17 हजार 669 मिळकत पत्रिका तयार झाल्या आहेत,अशी माहिती जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख विजय वीर यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






