हिंदूंचीही मते एमआयएमला मिळाली, एमआयएम पक्ष पुन्हा उभे राहील- नासेर सिद्दीकी
 
                                हिंदूंचीही मते एमआयएमला मिळाली, एमआयएम पक्ष पुन्हा उभे राहील- नासेर सिद्दीकी
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत शहरातील अधिक वार्डात व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर हिंदूंची मतेही इम्तियाज जलील यांना मिळाली. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम केले. एकदा आमदार आणि एकदा खासदार पदावर काम करण्याची संधी येथील जनतेने त्यांना दिली. एमआयएमला 3 लाख 40 हजार 877 मते मिळाली आहे. जनतेने भरभरून आशिर्वाद दिले. म्हणून मतदारांचे मनापासून आभार. पराभवाची समीक्षा आम्ही करत आहोत. जिल्ह्यातील जनतेत इम्तियाज जलील यांची लोकप्रियता कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष सर्व चुका सुधारून पुन्हा उभे राहिल. इम्तियाज जलील यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते इम्तियाज जलील यांच्या सोबत आहे. या निवडणुकीत झालेल्या चुकी सुधारुन जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज राहणार आहे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागावे असे आवाहन आपल्या वाढदिवशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी यांनी आवाहन केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            