10 ऑगस्टला हज हाऊसमध्ये ज्वलंत प्रश्नांवर मराठवाडास्तरीय कार्यशाळा...

10 ऑगस्टला हज हाऊसमध्ये मराठवाडास्तरीय कार्यशाळा...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8 (डि-24 न्यूज) -
मानवी जीवनात भेडसावणा-या ज्वलंत प्रश्नांवर हज हाऊस येथे मुस्लिम नुमायंदा कौन्सिलच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन 10 ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी पहिल्या 10.30 ते दुपारी 1, दुस-या सत्रात दुपारी लंच नंतर 2.30 ते 5.30 वाजेपर्यंत असणार आहे.
जन सुरक्षा कायदा, धार्मिक स्थळावरील भोंगे, वक्फ संशोधन कायदा - 2025, शहराचा डिपी प्लॅन, गुंठेवारी कायदा, धार्मिक स्थळ कायदा, जमीन महसूल कायदा अशा ज्वलंत प्रश्नांवर तज्ञ आपली मते मांडणार आहे. जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार परिषदेत मुस्लिम नुमायंदा कौन्सिलचे अध्यक्ष जियाउद्दीन सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले वक्फची धार्मिक हैसियत या विषयावर मुफ्ती अनिसुर्रहमान हे मार्गदर्शन करणार आहे. वक्फ संशोधन कायदा - 2025 चे सखोल अभ्यासक व जेष्ठ मार्गदर्शक अब्दुल रऊफ शेख(नागपूर) हे मार्गदर्शन करतील. मस्जिदवरील भोंग्यावर एड खान सलिम खान हे मार्गदर्शन करतील. गोवंश कायदा, जनसुरक्षा कायद्यावर जेष्ठ विविज्ञ मार्गदर्शन करतील. शहराचा डिपी प्लॅन, गुंठेवारी कायदा 1991 चा धार्मिक स्थळ बद्दल जमीन महसूल कायदा 1966, एम.आर.टी.पी. कायदा या ज्वलंत विषयावर कार्यशाळा होणार आहे. पत्रकार परिषदेत महासचिव मेअराज सिद्दीकी, मोहंमद रजा उपस्थित होते.
What's Your Reaction?






