12 ऑगस्टला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शहरात, विधानसभा निवडणुकीचा घेणार आढावा
12 ऑगस्टला शहरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा दौरा...
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.9(डि-24 न्यूज)
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सज्ज झाली असून 10 ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भात जिल्हानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख हे जिल्हानिहाय बैठका घेऊन काँग्रेस नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
12 ऑगस्टला शहरातील जीमखाना क्लब हाॅटेलात सकाळी 10 वाजता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसची बैठक होईल. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे.
मराठवाड्यातील दौऱ्यात 10 ऑगस्ट रोजी लातूर येथे लातूर, धाराशीव(उस्मानाबाद), बीड जिल्हा, दिनांक 11 ऑगस्ट रोजी नांदेड येथे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा तसेच दिनांक 12 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा काँग्रेसची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. महविकास आघाडीत छ.संभाजीनगर(औरंगाबाद) येथील सहा तर जालना जिल्ह्यातील तीन जागेची मागणी पक्षाकडे करणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील चार मतदार संघातून मागच्या निवडणुकीत निवडणूक लढली होती. राज्यात सर्वाधिक जागा लोकसभेत काँग्रेसच्या निवडून आले होते. म्हणून मराठवाडा व राज्यात काँग्रेसची ताकत वाढली असल्याने इच्छुक उमेदवारांशीही या बैठकीत प्रमुख नेते संवाद साधणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जालन्याचे खासदार डॉ.कल्याण काळे यांनी दिली. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख, किरण पाटील डोणगावकर, जगन्नाथ काळे, अनिस पटेल, महीला शहराध्यक्ष दिपाली मिसाळ, महीला जिल्हाध्यक्ष दिक्षा पवार यांची उपस्थिती
होती.
What's Your Reaction?