3 ऑक्टोबर रोजी नियोजित भारत बंद मागे...

3 ऑक्टोबर रोजी पुकारलेला बंद मागे....
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची माहिती
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)-“वक्फ संशोधन बिल विरोधात 3 ऑक्टोबर शुक्रवारी रोजी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने भारत बंदची हाक देण्यात आली होती. सरकारने या बिलात केलेल्या सुधारणा त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला होता. हा बंद देशात विविध सण व उत्सव होणार असल्याने पुढे ढकलण्यात आला असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. आपल्या देशात धार्मिक उत्सव त्या दिवशी देशातील काही राज्यांमध्ये आयोजित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक घेण्यात आली.
परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर, 3 ऑक्टोबर रोजी होणारा भारत बंद पुढे ढकलण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 3 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेला भारत बंद स्थगित करण्यात आला आहे.
तथापि, वक्फ अमेंडमेंट अॅक्टविरुद्ध बोर्डाचा आंदोलन कार्यक्रम नियोजनाप्रमाणेच सुरू राहील आणि इतर सर्व कार्यक्रम निश्चित तारखांनुसार पार पडतील.
मौलाना फजलुर रहीम मुजद्दिदी
महासचिव, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड
डॉ. एस. क्यू. आर. इलियास
प्रवक्ते व राष्ट्रीय संयोजक
सेव्ह वक्फ अभियान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
3 ऑक्टोबर रोजी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते. याची तयारीही करण्यात आली होती. परंतु विविध समाजाचे सण उत्सव असल्यामुळे हा बंद पुढे ढकलण्यात आला आहे. काही काळानंतर नवीन तारीख ठरवून जाहीर केली जाईल, असे आवाहन मुफ्ती मोहम्मद मोईजुद्दीन कासमी, अध्यक्ष मराठवाडा आमिरे शरीयत, सदस्य ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि मौलाना महफुजर्रहमान फारुकी, सदस्य मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी केले आहे.
त्यांनी युवकांना आवाहन केले"आय लव मोहम्मद" असे बॅनर लावल्यामुळे गुन्हे दाखल होऊन अटकसत्र सुरू आहे, याचा निषेध मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे करण्यात आला आहे. तरुणांना आणि उलेमा-ए-दिन यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे की
प्रेषित पैगंबर मोहम्मद स.अ.व.स. यांनी संपूर्ण जगाला शांती आणि बंधुतेचा संदेश दिला आहे. आपणही त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे. त्यांच्यावरील प्रेम आपल्या अंतःकरणात आहे, ते बॅनर लावून दर्शवू नये. कारण त्यामुळे देशात दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो. कायद्याचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. इस्लाम धर्माने जी शिकवण दिली ती शिकवण आपल्याला मिळालेली आहे. त्यांचे अनुकरण करत इबादत करावी असे आवाहन मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती मोहम्मद मोईजुद्दीन कासमी, आमीर इमारते शरीया, मराठवाडा आणि मौलाना महफुजर्रहमान फारुकी यांनी केले आहे.
What's Your Reaction?






