आरक्षणाच्या उपवर्गीकरणा विरोधात आंबेडकरी समाज अक्रामक, क्रांतीचौकात केली निदर्शने

 0
आरक्षणाच्या उपवर्गीकरणा विरोधात आंबेडकरी समाज अक्रामक, क्रांतीचौकात केली निदर्शने

आरक्षणाच्या उपवर्गीकरणा विरोधात आंबेडकरी समाज आक्रमक...

विविध आंबेडकरी संघटनांचे क्रांतिचौक येथे जोरदार निदर्शने...आज विविध पक्ष संघटनांनी दिली होती भारत बंदची हाक...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.21(डि-24 न्यूज) सर्वौच न्यायालयात 7 न्यायमूर्तीच्या घटनापीठाने देशातील अनुसूचित जाती- जमातीचे अबकड अशा उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निकालाविरोधात विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करून दलित आदिवासी ओबीसीमध्ये फूट पडून राजकारण केले जात असल्याने न्यायालयाने अशा प्रकारे हस्तक्षेप करून देशातील जनतेत न्याय व्यवस्थेविषयी असंतोष पसरविला असल्याने या न्यायमूर्ती विरोधात महाभियोग खटला चालवावा, ह्या बाबत रिव्ह्यू पिटीशन दाखल करून यास स्थगिती द्यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी रतनकुमार पंडागळे, दिनकर ओंकार, मुकुंद सोनवणे, रमेश गायकवाड, अमित भुईगळ, श्रावण गायकवाड, कैलास गायकवाड, माजी नगरसेवक प्रकाश खंदारे, नौशाद उस्मान, राहुल साळवे, सचिन बनसोडे, दिपक निकाळजे, सचिन निकम, विजय वाहुळ, गुणरत्न सोनवणे, बाळू वाघमारे, बलराज दाभाडे, वसंतराज वक्ते, लक्ष्मण हिवराळे, विजय साळवे, इंद्रकुमार जेवरीकर, श्रीरंग ससाणे, चंद्रकांत रुपेकर, जयश्री शिर्के, प्रीती दुबे,अनामि मोरे, अरविंद अवसरमोल, काकासाहेब गायकवाड, आनंद बोर्डे, विजय बचके, नरेश वरठे, मनीष नरवडे, सुमित सुरडकर, विशाल खरात, विश्वदिप करंजीकर, जयंत जावळे, राहुल जाधव, नितेश भोळे, सनी ओव्हळ, अमोल पवार, सिद्धार्थ पवार, नितीन मधीकडं, शैलेंद्र मिसाळ, रमेशदादा साळवे, राजू भाऊ त्रिभुवन, सय्यद अहमद नजीर, शेख शफीक, अजिनाथ पाचवणे, भगवान पवार, सचिन चावरे, राहूल साळवे, सचिन महापुरे, संघपाल सोनवणे, संदीप जोगदंड, संदिप वाहुल, राहुल मकासरे, शेख शकील, विकास हिवराळे, धम्मपाल भुजबळ, शैलेंद्र म्हस्के, कुणाल भालेराव, प्रबोधन बनसोडे, अविनाश कांबळे, प्रा.किशोर वाघ, सचिन शिंगाडे, राहुल कानडे, रामराव नरवडे, संगपाल सोनवणे बाबासाहेब पगारे संदीप जोगदंड, विष्णू वाघमारे आदींची उपस्थिती होती तर बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, आजाद समाज पार्टी, क्रांती संघटना, मराठवाडा बहुजन विकास आघाडी, आंबेडकरवादी बहुजन विकास समिती, भारतीय क्रांती दल, आंबेडकरवादी संघर्ष समिती, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, भारतीय दलित कोब्रा, डॉ.आंबेडकर नगर युवा कृती समिती, सामाजिक समता संघ, पँथर सेना, भीम आर्मी, परिवर्तनवादी चळवळ,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस,रिपाई (खरात), आंबेडकरवादी चळवळ, दामिनी महिला समिती, कास्ट्राईब कर्मचारी संघटना आदींनी यात सहभाग नोंदवला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow