उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी...

 0
उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी...

उन्हाळ्यात उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी;

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23(डि-24 न्यूज)- येत्या कालावधीत उन्हाळ्यात तापमान वाढ होऊन त्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. अशा या उष्मा लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

काय करावे...?

१. पुरेसे पाणी प्या.तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी प्या.

२. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.

३. दुपारी १२ ते ३ वाजे दरम्यान शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.

४. सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.

५. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करा.  

६. हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

७. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

८. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.

९. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे,लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.

१०. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची लक्षणे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

११. गुरांना छावणीत ठेवावे, पिण्यास त्यांना पुरेसे पाणी द्यावे.

१२. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या.

१३. पंखे, ओले कपडे याचा वापर करावा.तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.

१४. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करावी.

१५. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे.

१६. पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.

१७.गरोदर स्त्रिया आणि आजारी व्यक्तिंची अधिक काळजी घ्यावी.

१८. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या @ SDMAMaharashtra या ट्विटर, फेसबुक व कु-अॅप वरील सुचना पहाव्यात.

१९. जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या सूचना पहाव्या.

काय करु नये ?

१. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका.

२. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड- थंड पेये घेऊ नका.

३. दुपारी १२ ते ३ या वेळे दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

४. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.

५. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

६. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

७. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

 ८. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

उष्मा लाटेपासून स्वतःचा व आपल्या आप्तेष्टांच्या बचावासाठीवरीलप्रमाणे उपाययोजना अवलंबाव्या,असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन विधाते यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow