कर्करोगाविरुध्द संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम...

 0
कर्करोगाविरुध्द संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम...

“कर्करोगाविरुद्ध संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम”...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.23 (डि-24 न्यूज)- महानगरपालिकेचे आयुक्त श्री. जी. श्रीकांत सर यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 23/03/2026 रोजी बन्सीलालनगर रुग्णालय येथे “कर्करोगाविरुद्ध संरक्षण कवच – एचपीव्ही लसीकरण मोहीम” सुरू करण्यात आली.

यावेळी प्रभाग क्र. 18 च्या नगरसेविका मा. श्रीमती हर्षदाताई संजय शिरसाट, नगरसेवक मा. श्री. अभिजित देविदास जीवनवाल, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भामरे, डॉ. पंडित सिरसाट, डॉ. सुर्यकुमार ठाकूर, I/C शुभांगी भोपळे सिस्टर, ज्योती काळे सिस्टर, शिला राठोड सिस्टर, IFM उज्वला इंगुळे, राजेश शिंदे व बन्सीलालनगर रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व तसेच याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

HPV व्हायरसमुळे होणारा जंतुसंसर्ग हा गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा मुख्य कारणीभूत घटक असून, योग्य वयात लसीकरण केल्यास या आजारापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळू शकते. ही लस सुरक्षित व प्रभावी असून भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे 14 ते 15 वयोगटातील मुलींनी ही लस वेळेत घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सदर मोहिमेदरम्यान 14 ते 15 वयोगटातील 10 मुलींना लसीकरण करून प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच पुढील काळातही महानगरपालिकेच्या सिडको एन-8, सिडको एन-11, कैसर कॉलनी, सिल्कमिल कॉलनी व बन्सीलालनगर रुग्णालयामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी पालकांनी आपल्या 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींना लसीकरणासाठी घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow