कुर्बानीसाठी शहरात 3 कत्तलखान्यांना परवानगी...

 0
कुर्बानीसाठी शहरात 3 कत्तलखान्यांना परवानगी...

कुर्बानीसाठी तीन कत्तलखान्यांना परवानगी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.2 (डि-24 न्यूज)- ‘बकरी ईद’ या सणानिमित्त कुर्बानीसाठी शहरातील तीन अधिकृत कत्तलखान्यांमध्ये परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ३३३(१) (२) व ३७८ (१)(क) चार अन्वये हे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ अन्वये (सुधारीत) १९९५अन्वये बकरी ईद या सणानिमित्त अधिकृत कत्तलखान्यास सकाळी ८ ते दुपारी २ यावेळात चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. कत्तलखाने व परवानगी कालावधी याप्रमाणे-

             शुक्रवार दि.६ रोजी प्रभाग क्रमांक ९ दाऊदी बोहरा जमात अंजुमन ए सैफी, बोहरा कब्रस्थान, दाऊदपुरा पाटीदार भवनाच्यामागे जालना रोड. 

 शनिवार दि.७ रोजी प्रभाग क्रमांक १ पडेगाव कत्तलखाना मनपा, प्रभाग क्रमांक ३ शहाबाजार कत्तलखाना मनपा.

वरील प्रमाणे अधिकृत कत्तलखान्यात परवानगी दिलेल्या कालावधी व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही उघड्यावर किंवा इतरत्र जनावरांची कत्तल करु नये. उघड्यावर मांस वाहतुक करु नये. विशिष्ट कालावधीकरीता ही परवानगी असली तरी नियमितपणे चालविण्याच्या कत्तलखान्याचे सर्व नियम, अटी व शर्ती त्यासाठी लागू राहतील,असेही मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow