दुष्काळ आणि शेंद्रीय शेतीवर आधारित मराठी चित्रपट "कानन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...!"

 0
दुष्काळ आणि शेंद्रीय शेतीवर आधारित मराठी चित्रपट "कानन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...!"

मराठी चित्रपटसृष्टीत नवा धमाका! ‘कानन’ चित्रपटाची घोषणा; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दुष्काळाने शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान न भरणारे आहे, पावसाअभावी ज्या शेतात काही पिकत नाही अशा शेतकऱ्याचे कथा या चित्रपटात मन हेलावून टाकणारी आहे तर शेंद्रीय शेतीकडे शेतकऱ्यांनी कसे वळावे यामुळे आपले जीवनमान कसे सुधारता येवू शकते अशी कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शहरातील चित्रपटगृह असो किंवा ग्रामीण भागातील टुरींग टाॅकीजमध्ये दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती मुख्य भुमिका साकारणारे मराठी अभिनेता नितिन शिवाजी पारवे यांनी पत्रकार परिषदेत दिली...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज)- मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नवनवीन प्रयोग आणि दर्जेदार विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होत आहे. याच प्रवासात आता आणखी एका नव्या आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाची भर पडणार असून ‘कानन’ या आगामी मराठी चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, चित्रपटाचे आकर्षक पोस्टर, टीझर तसेच गाणी सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

‘कानन’ हा कौटुंबिक, रोमँटिक तसेच शेतकरी आणि समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारा चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आणि सामाजिक वास्तवाचा वेध घेणारी कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती ‘नितीन शिवाजी पारवे’ यांच्या ‘शिवाजी फिल्म प्रोडक्शन’ यांच्या माध्यमातून करण्यात आली असून, दिग्दर्शनाची धुरा सतीश ढोणे यांनी सांभाळली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तो आवश्य बघावे असे आवाहन पत्रकार परिषदेत मुख्य अभिनेता नितिन पारवे यांनी केले आहे.

नामवंत कलाकारांची मांदियाळी

चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मुख्य भूमिकेत नितीन शिवाजी पारवे असून, कोमल श्रीसुंदर आणि अधिरा बुरकुळे या प्रमुख कलाकारांसह जयराज नायर, पांडुरंग भारती, शुभम पारवे आणि मुरलीधर आढाव हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी संगीतकार कै. सुरेश घायावत यांनी सांभाळली असून, चित्रपटातील गाणी श्रवणीय आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारी असतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

वेगळ्या विषयाची कथा प्रेक्षकांना भावणार

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सतीश ढोणे म्हणाले की, “आम्ही एक अतिशय वेगळा आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा विषय घेऊन येत आहोत. चित्रपटाचे कथानक हाच या सिनेमाचा मुख्य कणा आहे.”

‘कानन’च्या माध्यमातून शेती, शेतकरी, कुटुंब, प्रेम आणि सामाजिक वास्तव यांचा वेध घेत एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow