भाजपाचे महापौर पदासाठी समीर राजूरकर तर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल...विजय निश्चित..?
महापौर पदाचा भाजपाचे समीर राजूरकर तर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांचा उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगरचा भाजपाचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दुपारी एक वाजता मंत्री अतुल सावे यांनी शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत महापौर पदासाठी समीर राजूरकर यांच्या नावाची घोषणा केली. तर शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ हे उपमहापौर पदासाठी उमेदवार असणार आहे. दोघांनीही आपला उमेदवारी अर्ज महापालिकेत दाखल केला. दोन्ही पक्षांचे संख्याबळ बघाता निवड निश्चित मानली जात आहे. जंजाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पालकमंत्री संजय शिरसाट यांची अनुपस्थिती जाणवली यामुळे नाराजी आहे की काय असे वाटले होते परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समज दिली असल्याने नाराजी दूर झाली आहे यामुळे जंजाळ यांचा उपमहापौर पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. मंत्री अतुल सावे यांनी पालकमंत्री यांच्या नाराजीवर पडदा टाकला. त्यांनी सांगितले शिवसेनेत नाराजी नाही दोन्ही पक्ष शहराच्या विकासासाठी एकत्र काम करणार आहे.
समीर राजूरकर व राजेंद्र जंजाळ यांना महापालिकेत काम करण्याचा अनुभव आहे. केंद्रात व राज्यात शिवसेना मित्रपक्ष आहे म्हणून महापालिकेत एकत्र काम करण्यात अडचणी येणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास करु असे पत्रकार परिषदेत मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
भाजपाचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले शिवसेना व भाजपाने महापालिका निवडणुकीत मैत्रिपूर्ण लढत केली. हिंदूत्वाच्या भुमिकेवर आम्ही एकत्र आहोत. राज्यात आणि शहरात एकत्र काम केले पाहिजे. हि आमची भूमिका आहे. भाजपचा महापौर व शिवसेनेचा उपमहापौर होणार आहे. युती होणारच होती कारण विकासकामे करत असताना दोघांनी एकत्र काम करत विकास करणार. शहराचा पाण्याचा प्रश्न लवकर सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे प्रभारी विलास पारकर यांनी सांगितले महायुतीत भाजपा मोठा भाऊ आहे शिवसेना छोटा भाऊ आहे मान्य केले आहे. हि निवडणूक कार्यकर्त्यांची होती. महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी एकत्र काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?