म्हशीच्या गोठ्यांवर फिरला मनपाचा बुलडोझर...

 0
म्हशीच्या गोठ्यांवर फिरला मनपाचा बुलडोझर...

खाम नदी पात्रातील अतिक्रमणांवर मनपाची कारवाई..‌.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)-बेगमपुरा परिसरातील मोहोळ्ला स्मशानभूमी येथे खाम नदी पात्रात करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. दि. 14 मे 2026 रोजी पार पडलेल्या या मोहिमेत म्हशींचे गोठे तसेच भंगार गोदाम हटविण्यात आले.

मनपाच्या पथकाने 10 बाय 35 मीटर क्षेत्रफळातील एकूण सहा म्हशींचे गोठे आणि एक भंगार गोदाम निष्कासित केले. ही कारवाई आयुक्त आणि अतिक्रमण नियंत्रण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपआयुक्त (अतिक्रमण) श्रीमती सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत पदनिर्देशित अधिकारी श्रीमती लता पुजारी, सहाय्यक आयुक्त झोन क्र. 1 श्री. संजय सुरडकर, सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) तसेच बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पापळकर सहभागी होते. याशिवाय इमारत निरीक्षक श्री. मुकेश खडसे, श्री. रविंद्र देसाई, श्री. सागर श्रेष्ठ आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित हो

ते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow