महाराष्ट्र केसरी विजेते सईद चाऊस उतरले आखाड्यात...

मल्ल, पैलवानांनी रंगवला जिल्हा गणेश महासंघाच्या कुस्त्यांचा आखाडा
जिल्हा परिषदेच्या मैदानावर मल्लांच्या कुस्त्यांची लक्षवेधी दंगल
महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान सईद चाऊस यांनी वाढवला उत्साह
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3 (डि-24 न्यूज) - ऐकमेकांवर मात करत, धुळ चाटविणारे डावपेच अन् मल्लांच्या सहभागाने लक्षवेधी ठरलेला जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने आयोजित कुस्त्यांचा आखाडा बुधवारी (दि. 3) मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या यावर्षी मल्लांनी यावर्षी रंगवला. संभाजी पेठेतील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित या कुस्त्यांच्या दंगलचे उदघाटन महाराष्ट्र केसरी विजेते सय्यद चाऊस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलिस सुनील माने, संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष अनिकेत निल्लावार, मुख्य मार्गदर्शक डॉ. हंसराज डोंगरे, माजी नगरसेवक किशोर तुळशी बागवाले, गणू पांडे, यांची उपस्थिती होती. कुस्ती स्पर्धेच्या पुर्वीच पावसाने काही काळ दमदार हजेरी लावल्याने कुस्तीपटूंचा आनंद द्विगुणीत होत या दंगलीला उत्साहात सुरुवात झाली. दहा रुपयांपासुन तर अकरा हजार रुपायांपर्यंत कुस्ती पटुंची दंगल यावेळी रंगल्याने शहरातील खेळाडुंनी या कुस्त्यांच्या दंगलीत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चाळीसगाव (खान्देश ), हर्सूल, बेगमपुरा, आष्टी (जिल्हा बीड), चिकलठाणा यासह जिल्हातील विविध ग्रामीण भागातील कुस्तीपटुंनी कुस्तीच्या आखाड्यात ऐकमेकांना चितपट करत कुस्तीचा आखाडा रंगवला. सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे पैलवान सईद चाऊस ( महाराष्ट्र केसरी 2006) हे होते. या कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष विक्की जाधव, शिवा ठाकरे, हरीश शिंदे, फैजान शेख, अजय कागडा, संजय दुरबे, वैभव ठाकरे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, यांनी पुढाकार घेतला.
या भव्य कुस्ती स्पर्धेसाठी पंच कमिटी चे मुख्य मार्गदर्शक म्हणून उस्ताद डॉ. हंसराज डोंगरे, सल्लगार समिति म्हणून ऍड सेवकचंद बाखरीया, पैलवान ज्ञानेश्वर जाधव, विनायक पांडे, फुलचंद सलामपुरे, सूरजलाल मेघावाले, हिरा सलामपुरे, जगदीश सिद्ध, चेतन जांगडे, सुरेश पवार, तर पंच कमिटी म्हणून मंगेश डोंगरे, रामेश्वर विधाते, सोमनाथ बखले, प्रवीण कडपे, पै. विष्णु गायकवाड, भगवान चित्रक, हरिदास म्हस्के, अर्जुन औताडे, मुख्तार पटेल, नवनाथ औताडे, इद्रीस खान, अशोक गायकवाड, अविनाश पवार, संदेश डोंगरे यांनी काम पाहिले तर कुस्ती स्पर्धेचे निवेदन बाबासाहेब थोरात यांनी केले.
What's Your Reaction?






