मुस्लिम आरक्षण व स्वरक्षणासाठी दलित पँथर मैदानात

 0
मुस्लिम आरक्षण व स्वरक्षणासाठी दलित पँथर मैदानात

मुस्लिम आरक्षण व स्वरक्षणासाठी दलित पँथर मैदानात

औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज)

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे व स्वरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी भारतीय दलित पँथर संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण भूतकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

याप्रसंगी जनजागरण समिती महाराष्ट्रच्या वतीने मोहसीन अहेमद यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. यामुळे दलित व मुस्लीम समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

विभागीय आयुक्त यांना सादर केलेल्या निवेदनात केंद्र सरकारला मागणी केली आहे अनेक वर्षांपासून मुस्लिम समाज हा दारिद्रय रेषेखाली जीवन जगत आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा नारा आहे "सबका साथ सबका विकास" या म्हणीप्रमाणे सर्वधर्मसमभाव हे स्वप्न साकार करायचे असेल तर मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण द्यावे. देशाच्या जडणघडणीत जो समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक आणि औद्योगिक दृष्ट्या मागासलेला आहे. या समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण द्या. या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दलित पँथरचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक निवृत्ती सांगवे यांनी दिनांक 18 सप्टेंबर पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्ते धरणे निदर्शने करण्यासाठी सहभागी झाले.

मुस्लिम समाजाला मोफत शिक्षण द्यावे, शासकीय निमशासकीय क्षेत्रात आरक्षण देऊन नोक-या देण्यात यावे. देशातील मुस्लिम बांधवांना बांगलादेशी, पाकिस्तानी, अफगाणिस्तानी असे सुडबुध्धीने चिडवणे बंद करा. राज्यातील मुस्लिम समाजाला सर्व क्षेत्रात आरक्षण द्या. या समाजाला स्वरक्षण द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी जनजागरण समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष मोहसीन अहेमद, नाजिमोद्दीन काजी, दशरथ कांबळे, संजय सरोदे, सय्यद हबीब, अमोल भूतकर, एड सतीश राऊत, समाधान कस्तुरे, शेख सलीम, मुसा भाई, आरेफ भाई, रामदास पगडे, उत्तम डोंगरे, गौतम सोनवणे, दिलीप पवार, योगेश जुमडे, महिला आघाडीच्या गीताताई म्हस्के, सुबिधाबाई कासारे, पार्वतीबाई घोरपडे, शिलाबाई मोकळे, मिनाबाई शिंदे आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow