उपराष्ट्रपती धनखड यांचे घृष्णेश्वराचे सपत्निक दर्शन... कैलास लेणीचीही केली पाहणी

उपराष्ट्रपती धनखड यांचे घृष्णेश्वराचे सपत्निक दर्शन;...
कैलास लेणीचीही केली पाहणी...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.22 (डि-24 न्यूज)- भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज वेरूळ येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. त्यांच्या समवेत उपराष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी डॉ. श्रीमती सुदेश धनखड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, खासदार डॉ. भागवत कराड होते. या वेळी मंदिर प्रशासनाने त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर उपराष्ट्रपती धनखड यांनी विश्ववारसा स्थळ असलेल्या वेरुळ येथील लेणी क्र. १६ कैलास लेणेची पाहणी केली. त्यांनी येथील वारसास्थळ आणि लेणींविषयी माहिती जाणून घेतली. या परिसरातील कलाकृती ह्या अदभूत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
What's Your Reaction?






