वेट अँड वाचच्या स्थितीत मी आहे- हर्षवर्धन जाधव

 0
वेट अँड वाचच्या स्थितीत मी आहे- हर्षवर्धन जाधव

वेट अँड वाचच्या स्थितीत मी आहे- हर्षवर्धन जाधव

इम्तियाज जलील यांना मिळतील दिड लाख मते, खैरेंची मते दोन ठिकाणी विभागली... हर्षवर्धन जाधव यांची भविष्यवाणी...म्हणाले परिवर्तनाची गरज...

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) 24 मार्च रोजी मनोज जरांगे पाटील यांची बैठकीतील भुमिका, शांतिगिरी महाराज व वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भुमिका स्पष्ट झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीत उभे राहायचे की नाही हा निर्णय घेणार सध्या मी वेट अँड वाॅचच्या स्थितीत आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की या निवडणुकीत राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसेनेत फुट पडल्याने मागिल निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना मिळालेली 3 लाख 70 हजार मते दोन ठिकाणी विभागली आहे. एमआयएम व वंचित सोबत असल्याने इम्तियाज जलील यांना 3 लाख 74 हजार मते मिळाल्याने ते विजयी झाले होते. सध्या वंचित त्यांच्यासोबत नसल्याने या निवडणुकीत इम्तियाज जलील यांना दिड लाख मते मिळतील. वंचितची मते त्यांना मिळणार नाही. ग्रामीण भागातील जनता जलिल यांच्यावर नाराज आहेत. मला 2 लाख 83 हजार मते मिळाली होती यामध्ये तुकडा पडला नाही म्हणून दिल्लीतून मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी माझी भूमिका आहे. दोन लाख मते जो उमेदवार घेईल तो उमेदवार निवडून येईल असा अंदाज हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केला आहे. शिंदे फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे म्हणून महायुतीच्या उमेदवाराला मतदार स्विकारणार नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून माझे समाजकार्य सुरू आहे. 24 मार्च नंतर समाजासोबत चर्चा करून भुमिका ठरवणार अशी माहिती पत्रकार परिषदेत त्यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow