सिध्दार्थ उद्यानात येणार 2 सिंह, 2 कोल्हे, 2 अस्वल...

शिवमोग्गा प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांनी केली वाघांची पाहणी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24 न्यूज) - महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालय येथे असणाऱ्या 3 वाघांची आज शिवमोग्गा प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
पांढरा वाघ विक्रम, पिवळ्या वाघिणी रोहिणी व श्रावणी हे तीन वाघ शिवमोग्गा प्राणी संग्रहालय कर्नाटक येथे पाठविण्यात येणार आहेत. या बदल्यात 2 सिंह, 2 अस्वल व 2 कोल्हे सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाला प्राप्त होणार आहेत.
आज शिवमोग्गा प्राणी संग्रहालय यांचे कार्यकारी संचालक व्ही.एम अमराकशर ,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुरली मनोहर यांनी या तिन्ही वाघांची पाहणी केली. यावेळी उप आयुक्त तथा विभाग प्रमुख अपर्णा थेटे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख शाहेद ,संजय नंदन, डॉ. निती सिंग यांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?






