स्वच्छता ही सेवा - 2025 शाळांच्या विद्यार्थ्यांनी केले श्रमदान...

स्वच्छता ही सेवा 2025
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज) -
"25 सप्टेंबर 2025 एक दिवस एक तास एक साथ" या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील सर्व मनपा शाळा तसेच खासगी शाळामध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला. जवळपास 100 पेक्षा जास्त शाळा तसेच महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय परिसर, इ ठिकाणी हे स्वच्छता अभियान घेण्यात आले.
या उपक्रमाचा मुख्य कार्यक्रमाची सुरुवात आज नारेगाव मनपा उर्दू व मराठी शाळा येथे स्वच्छता अभियान घेऊन करण्यात आली. यावेळी शाळा व शाळेचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच शहरातील इतर मनपा शाळांमध्ये चालू असलेल्या कामांना उपायुक्त यांनी विशेष भेटी दिल्या त्यामध्ये प्रामुख्याने प्रियदर्शनी इंदिरानगर मनपा शाळा, गारखेडा मनपा शाळा, मनपाच्या सीबीएससी शाळा, इ शाळांना भेटी दिल्या.
सर्व शालेय विद्यार्थी, प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर एक तास श्रमदान करून स्वच्छ करण्यात आला.
यावेळी मानवी साखळी द्वारे भारत देशाचा नकाशा आखण्यात आला तसेच उपायुक्त श्री. नंदकिशोर भोंबे सर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली व विद्यार्थ्यांना घर-शहर-परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच शहरातील सर्व शाळांमध्ये शालेय शिक्षक वृंद, शालेय विद्यार्थी, स्वच्छता कर्मचारी, इ सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ केला.
उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन प्रमुख श्री नंदकिशोर भोंबे सर, उपायुक्त शिक्षण विभाग श्री. अंकुश पांढरे सर, मा.सहाय्यक आयुक्त प्राजक्ता वंजारी मॅडम,
भारत तिनगोटे शिक्षण अधिकारी, रामनाथ थोरे विस्तार अधिकारी, ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी, स्वच्छता अधिकारी श्री अनिल जाधव सर , स्वच्छता अधिकारी श्री सचिन भालेराव सर, किरण जाधव, चेतन वाघ, गोविंद बारबोटे अधीक्षक शिक्षण विभाग, संगीता ताजवे मुख्याध्यापक नारेगाव मराठी, अब्रार अहमद मुख्याध्यापक नारेगाव उर्दू, प्रियदर्शनी इंदिरानगर येथे संजीव सोनार मुख्याध्यापक, गारखेडा येथे शशिकांत उबाळे मुख्याध्यापक, बावस्कर सर, तबडे सर, जुबेर सर, बाबुराव राठोड शिक्षक, स्वच्छता निरीक्षक सौरव घोरपडे ,स्वच्छता निरीक्षक रेणुका गायकवाड, स्वच्छता निरीक्षक अतिश खरात,राहुल बोर्डे, रेड्डी झोनल दिनेश बियाणी, स्वच्छता जवान संकुल मलके, राजू साबळे, रेड्डी सुपरवायझर रवी दांडगे, संदीप नरवडे, तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी, नारेगाव मनपा शाळेतील सर्व शिक्षक वृंद, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता जवान, स्वच्छता कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी, इ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?






