अडीच वर्षातील अपयश झाकण्यासाठी नवनवीन योजना - नितिन बानगुडे पाटील

 0
अडीच वर्षातील अपयश झाकण्यासाठी नवनवीन योजना - नितिन बानगुडे पाटील

अडीच वर्षांतील अपयश झाकण्यासाठी सरकारच्या नवनवीन योजना - नितीन बानगुडे पाटील

भाजपचे आश्वासन म्हणजे लबाडाचे निमंत्रण, विश्वास ठेवू नका 

मध्यचे उमदेवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ टीव्ही सेंटरला सभा 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) मुलगी शिकली, प्रगती झाली असं आपण म्हणतो. मात्र महायुती सरकारच्या काळात मुली असुरक्षित असल्याच्या घटना घडत आहेत. मुली शिकल्या तर तुमच्या 1500 रुपयांची गरज नाही, मात्र महागाई वाढून आर्थिक मदत हे परिवर्तन नाही. अडीच वर्षांतील अपयश झाकण्यासाठी सरकारच्या नवनवीन योजना असल्याची टीका शिवसेना उपनेते, शेतकरी सेनेचे अध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांनी केली. शेतकरी आत्महत्या करत असून, कर्जमाफीची घोषणा अडीच वर्षात का केली नाही, याचं उत्तर मागण्याची वेळ आली आहे

भाजपचे आश्वासन म्हणजे लबाडाचे निमंत्रण, विश्वास ठेवू नका, आता नवनवीन घोषणा करतील. 11 वर्षांपासून 15 लाखाचे आमिष दिले. युवकांना रोजगार देऊ सांगितले, आणि गुजरातला उद्योग पळविले. त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार निवडून द्या, उद्योग परत आणू, असे बानगुडे पाटील म्हणाले. छत्रपती संभाजीनगर मध्यचे उमदेवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ टीव्ही सेंटरला सभा झाली. यावेळी मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow