अनोळखी मयताची ओळख पटवण्याचे आवाहन...!
 
                                अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज):- येथील शहागंज भागात गांधी भवन जवळ बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी इसमास घाटी रुग्णालयात नेले असता त्यास तपासणीनंतर मयत घोषित केले. याबाबत सिटी चौक पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंदविण्यात आला असून या मयत इसमाचे वर्णन याप्रमाणे- वय अंदाजे 30 ते 35 वर्षे, अंगात पांढरा, लाल, निळा, राखाडी रंगाचे पट्टे असलेला हाफ बाह्यांचा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅण्ट, डाव्या हातावर जुन्या जखमेची निशाणी. या वर्णनाच्या इसमाबाबत काही माहिति असल्यास सिटी चौक पोलीस ठाणे येथील पोलीस हवलादार शेख शाहिद (9823956664) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन एस.वाय. शेख यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            