"अभिवंदन, अभिजात माय मराठीला" उद्या विद्यापिठात कार्यक्रमाचे आयोजन

’अभिवंदन, अभिजात माय मराठीला’ उद्या विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन
मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
- सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) माय 'मराठी'ला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर झाल्याच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’अभिवंदन, अभिजात माय मराठीला’ हा कार्यक्रम शनिवारी (दि.11) आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
केंद्र शासनाने मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यनिमित्त राज्य शासन व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी दुपारी 4 वाजता विद्यापीठ नाटयगृहात होणार आहे. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कर्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास मंत्री उदय सामंत (मराठी भाषा ) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी पंडित विश्वनाथ दाशरथे व शाहीर रामानंद उगले हे सांगितीक मानवंदना सादर करणार आहेत. या कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी तसेच संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या मराठी विषयाच्या शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर व मराठी विभागप्रमुख डॉ दासू वैद्य यांनी केले आहे.
What's Your Reaction?






