अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांच्या बेताल वक्तव्याबद्दल राजीनाम्याची मागणी.... शहरात जोरदार आंदोलन.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज)
पददलितांचा आवाज आणि संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये केलेल्या अपमानजक विधानाचा निषेध करण्यासाठी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे शहर जिल्हाध्यक्ष शेख युुसूफ यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ गेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले व अमित शहा त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणा देऊन राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मा.शेख युुसूफ, डॉ. जफर खान, डॉ. पवन डोंगरे, निलेश आंबेवाडीकर, इंजि. विशाल बन्सवाल, कैसर बाबा, संतोषकुमार दिडवाले, रमाकांत गायकवाड, सोहेल मसरूर खान, इद्रिस खान, अनिता भंडारी, शिला मगरे, शेख रईस, अखेफ रजवी, शेख अथर, योगेश बहादुरे, प्रमोद सदाशिवे, मूद्दसिर अन्सारी, निखिल गायकवाड, कृष्णा खरात, विशाल मोहिते, दत्ता चव्हाण, बळीराम खरात, सतीश जमधाडे, गौरव वानखेडे, सुभाष जाधव, आसाराम कनिसे, सय्यद युनूस, योगेश थोरात, सागर साळुंके, इरफान खान, जाफर खान, सय्यद फय्याज, शेख फय्याजोद्दीन, अलंकृत येवतेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?