आमखास मैदानावर बुधवारी आंबेडकरांच्या उपस्थितीत आरक्षण बचावो यात्रेचा समारोप...!

आमखास मैदानावर बुधवारी आंबेडकरांच्या उपस्थितीत आरक्षण बचावो यात्रेचा समारोप...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज) बुधवारी, 7 ऑगस्ट रोजी ऐतिहासिक आमखास मैदानावर आरक्षण बचावो यात्रेचा समारोप होणार आहे. दुपारी एक वाजता हि यात्रा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा एड बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत दाखल होईल त्यानंतर जाहीर सभा होईल. या यात्रेत एक लाख लोकांचा जनसमुदाय उपस्थित होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत राज्याचे महासचिव अरुंधतीताई सिरसाठ यांनी दिली आहे.
यावेळी वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले, जिल्हाध्यक्ष योगेश बन यांची उपस्थिती होती.
अरुंधती सिरसाठ यांनी पुढे सांगितले तात्कालीन स्व.पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांनी 7 ऑगस्ट रोजी ओबीसी समाजाला आरक्षण देण्याची शिफारस स्विकारली होती त्यानंतर आरक्षणाचा निर्णय झाला होता. आरक्षण बचावो यात्रा मुंबईतून राज्यात सुरु आहे. जालना जिल्ह्यातून हि यात्रा शहरात 7 ऑगस्टला दाखल होणार आहे. करमाड व शेंद्रा येथे विविध समाजाच्या वतीने यात्रेचे स्वागत होईल. चिकलठाणा येथे म्हसनजोगी समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येईल. संजयनगर येथे संत रोहिदास महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून यात्रा सिडको येथील वसंतराव नाईक यांच्या स्मारकाला अभिवादन करून येथे भटके विमुक्त जातीच्या वतीने स्वागत करण्यात येईल. क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात येईल. येथे ओबीसी समाज, वकील संघ व एक्स आर्मीच्या वतीने स्वागत होईल. औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून मिल काॅर्नर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून आरक्षण बचावो यात्रेचा समारोप कार्यक्रम आमखास मैदानावर होणार आ
हे.
What's Your Reaction?






