आमदार रोहित पवार यांनी घेतले श्री गणेश महासंघाच्या गणरायाचे दर्शन
आमदार रोहित पवारांच्या हस्ते श्री गणेश महासंघाच्या गणरायाचे दर्शन घेतले...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)दि.23(डि-24 न्यूज)- राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार ) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निराला बाजार येथील जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या कार्यालयास भेट देऊन श्री गणेश महासंघाच्या श्री गणरायाचे बुधवारी (दि. 23) दर्शन घेतले.
यावेळी श्री गणेश महासंघ उत्सव समितीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार, अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे पाटील यांनी राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार ) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वागत केले. या प्रसंगी क्रांती चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे, सजावट हॅण्डलूमचे संचालक संजय मंत्री, श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील, दिनेश राजेभासले राजेंद्र दानवे, संदीप शेळके, विशाल दाभाडे, हरीश शिंदे, प्रमोद ठेंगडे, नंदू लबडे, सागर निकम, नितीन पवार, विशाल काकडे, ऋषिकेश हिवाळे, विशाल जाधव, यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक नविनसिंग ओबेरॉय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजित चव्हाण, राजेश पवार, युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, कुलदीप शिंदे यांचीही उपस्थिती होती. यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांनी केले.
What's Your Reaction?