इम्तियाज जलील पुन्हा निवडून येणार, नार्वेकरांच्या निर्णयावर ओवेसींची प्रतिक्रिया

 0
इम्तियाज जलील पुन्हा निवडून येणार, नार्वेकरांच्या निर्णयावर ओवेसींची  प्रतिक्रिया

इम्तियाज जलील पुन्हा निवडून येणार, नार्वेकरांच्या निर्णयावर ओवेसींची प्रतिक्रिया

औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) खासदार इम्तियाज जलील हे आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून येतील असा विश्वास एम आय एम चे सुप्रीमो खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केला आहे.

ओवेसी हे ऐतिहासिक आमखास मैदानावर सुरू असलेल्या आयजे फेस्ट सेकंड सिझनमध्ये सुरु असलेल्या खासदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता व उपविजेता टीमला त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यासाठी व फायनल मॅच बघण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

शहागंज येथे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या शूभहस्ते करण्यात आले त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

त्यांनी पुढे सांगितले खासदार इम्तियाज जलील यांनी मतदार संघाचे अनेक प्रश्न लोकसभेत उपस्थित केले. कोरोनात दोन वर्षांचा कालावधी गेला तरीही मतदार संघाचा विकास करण्यासाठी त्यांनी प्रमाणिक प्रयत्न केला. आदर्श पतसंस्थेतील घोटाळयात अडकलेले पैसे गुंतवणूकदारांना  मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा त्यांना येथील जनता निवडून देतील. असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की नार्वेकर हे निकाल देताना त्यांनी संविधानातील शेड्यूल टेन विसरले. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणार का हा प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले हा प्रश्न इम्तियाज जलील यांना विचारा. सध्या आम्ही एकला चलो रे ची भुमिका घेत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आम्हाला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदार संघातील सर्व जाती धर्मातील जनता एमआयएम सोबत आहे म्हणून पुन्हा जलिल निवडणूक येतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार इम्तियाज जलील व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow