इम्तियाज जलील यांच्या अॅट्रासिटी अंतर्गत पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इम्तियाज जलील यांच्या विरोधात अॅट्रासिटी अंतर्गत पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.22(डि-24 न्यूज) पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील व इतर 15 ते 20 जणांविरुद्ध भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर महादेव शेंडगे यांच्या तक्रारीवरून अॅट्रासिटी अंतर्गत भारतीय दंड संहिता(बी एन एस), 2023 115(2), 191(2), अनुसूचित जाती व (अत्याचार प्रतिबंधक) 1989, 3(1)(r), 3(1)(s) कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार जालिंदर शेंडगे यांनी म्हटले आहे 20 नोव्हेंबर रोजी मतदान सुरू असताना भाजपाचा पदाधिकारी असल्याने भारतनगर, पंडित नेहरू काॅलेज येथील मतदान केंद्र क्रं.197 येथे मतदान सुरळीत चालू आहे का हे बघण्यासाठी गेलो असता एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील हे 15 ते 20 जणांना घेऊन आले. मतदार केंद्रावर मतदारांना धक्काबुक्की करत वाद विवाद केले मला जातीवाचक शिविगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तु माझ्या विरोधात काम करत आहे तुला दाखवतो म्हणत अपमान केला. अशी माहिती तक्रारात नमूद आहे.
What's Your Reaction?