इलेक्ट्रोल बाॅण्ड, शेतकरी आंदोलनावरून ध्यान हटवण्यासाठी सिएए- अलका लांबा
इलेक्ट्रोल बाॅण्ड, शेतकरी आंदोलनावरून ध्यान हटवण्यासाठी सिएए- अलका लांबा
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) इलेक्ट्रोल बाॅण्ड बाबत एसबीआय बँकेला चपराक बसली आहे तर शेतकरी आंदोलनावरून ध्यान हटवण्यासाठी मोदी सरकारने देशात सिएए कायदा लागू करुन नागरिकत्व देत आहे तर आपल्या देशातील 20 लाख लोक देश सोडून विदेशात गेले त्याचे काय.
अशा प्रश्न भाजपला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी विचारला आहे.
अलका लांबा ह्या कालपासून शहराच्या दौ-यावर आहे. गांधीभवन येथे त्यांनी एक नारीशक्तीवर कार्यक्रमात मार्गदर्शन केले त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.
त्यांनी सांगितले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला देशात प्रतिसाद मिळत आहे यामुळे भाजपात बेचैनी वाढत आहे यामुळे हिमाचल प्रदेश व झारखंड सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तेही जमले नाही. महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादीत फुट पाडली तरीही जनता इंडिया आघाडीच्या मागे दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, युवकांना नोकरी, महिलांना आरक्षण या विविध गॅरंटी राहुल गांधी यांनी दिली आहे. काँग्रेसच्या वतीने जी आश्वासने दिली जातात ती पाळली जातात म्हणून राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेला जनतेची गर्दी दिसून येत आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार अशा परिस्थितीत निवडणूक आयोगात फक्त एकच मुख्य आयुक्त काम पाहत आहेत. एक आयुक्त सेवानिवृत्त झाले तर दुस-यांनी राजीनामा दिला हि खेदाची बाब आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला जनता आशिर्वाद देणार आहे अशी देशाचे वातावरण आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा धुळ्यात दाखल झाली आहे तेथे इंडिया आघाडीचे नेते दाखल झाले आहेत. न्याय यात्रेचा समारोप महाराष्ट्रात होत आहे. मोदी वाघा सोबत आणि हत्ती सोबत फोटोसेशन करत आहे तर राहुल गांधी जनतेत जाऊन संवाद साधत आहे हे फरक दोन्ही नेत्यांमध्ये आहे असे लांबा यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष डॉ.कल्यान काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ, इब्राहिम पठाण, महीला शहराध्यक्ष की.दिपाली मिसाळ उपस्थित होते.
What's Your Reaction?