उद्या औरंगाबाद-जालना विधानपरिषदेसाठी मतदान, 3 उमेदवार मैदानात...!

 0
उद्या औरंगाबाद-जालना विधानपरिषदेसाठी मतदान, 3 उमेदवार मैदानात...!

औरंगाबाद-जालना विधान परिषदेसाठी उद्या मतदान...

2 जिल्ह्यांत 13 मतदान केंद्रांची स्थापना, 3 उमेदवार निवडणूक रिंगणात... 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.17(डि-24 न्यूज)- औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 दरम्यान मतदान होणार आहे. यासाठी दोन जिल्ह्यांत 13 मतदान केंद्र राहणार आहेत. 

या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात निवडणुकीतील अधिकाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर दुपारी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य पाठविण्यात आले आहे. साहित्य घेऊन अधिकारी, कर्मचारी संबंधित तालुक्याला रवाना झाले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने 9 क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 17 मतदान पथक असून त्यापैकी 4 पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानासाठी एकूण 85 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया नि:पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी 26 सुक्ष्म निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असून दोन जिल्ह्यांतील एकूण 637 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 399 तर जालना जिल्ह्यात 238 मतदार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान दरम्यान आचारसंहितेचा केवळ एकच गुन्हा दाखल झाला आहे, असेही गौडा यांनी सांगितले. 

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलीस बंदोबस्तातच मतपेट्या आणि इतर साहित्य छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात आणून जमा केले जाणार आहे. याच ठिकाणी सोमवारी 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांची उपस्थिती होती. 

मतदान केंद्र मतदार

सोयगाव 23, सिल्लोड 42, 

कन्नड 38, वैजापूर 38, खुलताबाद 27, फुलंब्री 25, 

छत्रपती संभाजीनगर 137, 

गंगापूर 33, पैठण 36, भोकरदन 42, जालना 90, 

अंबड 61, परतूर 45

एकूण 637

जिल्ह्यात 76 टक्के मतदारांची मॅपींग, 20 जूनपासून CSR

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात 20 जूनपासून प्रत्यक्षात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत 32 लाख 17 हजार 236 मतदारांपैकी 24 लाख 64 हजार 531 मतदारांचे (76.60 टक्के) मॅपींग पूर्ण झाले आहे. या एसआयआरसाठी 3 हजार 264 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ)ची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

SIR अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले की, 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई करण्यात येणार असून बीएलओंना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देणार असून गणना अर्जांचेे वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. 5 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. दाखल झालेल्या दावे, हरकतीं 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढले जाणार आहेत. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही गौडा यांनी सांगितले. 

या प्रक्रियेत राजकीय पक्षांना आपले प्रतिनिधी (BLA) नियुक्तीची मुभा आहे. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने 962 तर शिवसेनेेने 720 BLAची नियुक्ती केली आहे. एसआयआरसाठी 3264 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, 327 सुपरवायझर, 9 मतदार नोंदणी अधिकारी, 33 सहायक मतदार नोंदणी अधिकारी तर 11 नायब तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेले पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड यांची उपस्थिती होती.

1950 टोल फ्रि क्रमांक

सर्व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय येथे मतदारांसाठी मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच 1950 हा टोल फ्रि क्रमांकही उपलबद्ध करून दिला आहे. एसआयआरबद्दल किंवा जुन्या मतदार याद्यांतील माहितीबाबत या ठिकाणी संपर्क करता येणार आहे. 

4 लाख 58 हजार मतदार संदिग्ध

BLOनी आतापर्यंत केलेल्या मॅपींगमध्ये तब्बल 4 लाख 58 हजार 159 मतदार हे ॲनोमालीझ (संदिग्ध) आढळून आले आहेत. मतदार स्थलंतरित झाले किंवा मयत झाले, दिलेल्या पत्यावर आढळून आले नाही. ज्या मतदारांची नावे 2002 च्या एसआयआरशी जुळली नाही तर त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. अशांना मतदान अधिकाऱ्यांसमोर कागदपत्र सादर करता येणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow