मतदान केंद्रावर व्हिलचेअर नसल्याने उडाला गोंधळ, भाजपाच्या नगरसेविकेला उचलून नेण्याची नामुष्की...!

 0
मतदान केंद्रावर व्हिलचेअर नसल्याने उडाला गोंधळ, भाजपाच्या नगरसेविकेला उचलून नेण्याची नामुष्की...!

औरंगाबाद जालना विधानपरिषद निवडणूक, मतदान केंद्रावर व्हीलचेअर नसल्याने गोंधळ, 

भाजपाच्या नगरसेविकेला उचलून नेण्याची नामुष्की...

छत्रपती संभाजीनगर, (औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज)- औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदार संघासाठी आज सकाळी 8 वाजेपासून 13 मतदान केंद्रावर मतदानाला प्रारंभ झाला. शहरातील तहसील कार्यालयात सुरू झालेल्या मतदान केंद्रावर आज नियोजनशून्य कारभार पाहायला मिळाला. 

भाजपाच्या नगरसेविका सत्यभामा शिंदे या आजारी असताना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रावर आल्या. त्यांना चालता येत नसल्याने मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी व्हील चेअरची मागणी करण्यात आली. मात्र तिथे व्हील चेअरची व्यवस्था नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावेळी भाजपाचे नगरसेवक प्रमोद राठोड आणि इतर सदस्यांनी त्यांना खुर्चीवर उचलून मतदान केंद्रात आणले. मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था नसल्याचा आरोप करत उपस्थित सदस्यांनी संताप व्यक्त केला. आजारी नगरसेविकेला मतदानासाठी अडचणींचा सामना करावा लागल्याने मतदान केंद्रावरील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान, या प्रकारानंतर भाजप नगरसेवक प्रमोद राठोड यांनी मतदान अधिकाऱ्यांना जाब विचारला.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कुणी आजारी आहे का, मदतीची गरज आहे का, याबाबत लेखी विचारणा करण्यात आली होती. तेव्हा प्रत्येक पक्षाने याबाबत माहिती देणे आवश्यक होते. मात्र माहिती निरंक आली. तरीही मतदान केंद्रवर व्हील चेअर सह रुग्णवाहिका हजर होती. कर्मचारी मतदान केंद्रात असल्याने थोडा वेळ लागला व्हील चेअर काढण्यासाठी.

अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर यांनी दिली.

अतुल सावे यांचा विजयाचा दावा, एमआयएमची टिका, महाविकास आघाडीने बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही...

आज सकाळपासून सर्व दोन जिल्ह्यातील मतदान केंद्रावर दुपारी 12 वाजेपर्यंत 52.28 टक्के मतदान झाले. चार वाजेपर्यंत शंभर टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. तहसील कार्यालयासमोर मंत्री अतुल सावे व शिंदे सेनेचे नेते जम बसवू बसले होते. त्यांनी आमच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया देताना सांगितले महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट'हे शंभर टक्के विजयी होणार आहे. सकाळी 8 वाजता भाजपा, शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मतदारांनी मतदान केले. आमच्याकडे 337 मतांचा आकडा होता म्हणून घोडेबाजार करण्याची गरज पडली नाही. आमच्या उमेदवाराला 450 च्या आसपास मते मिळतील असा दावा त्यांनी केला आहे.

एमआयएमचे विरोधीपक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी दावा केला आहे आम्ही भाजपाला फाईट दिली. आमच्याकडे जेवढी मते होती त्याहून जास्त मते आम्हाला मिळतील. आम्ही सर्वात मोठे विरोधीपक्ष आहे. आम्हीच भाजपाचा मुकाबला करु शकतो हे या निवडणुकीत दाखवून दिले आहे. महाविकास आघाडी व एमआयएम सोबत आले असते तर या निवडणुकीत चित्र वेगळे दिसले असते या प्रश्नाच्या उत्तरात समीर म्हणाले महाविकास आघाडीने प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याशी चर्चा करायला हवी होती. माध्यमांसमोर येऊन पाठींबा मागितला असता तर वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला असता असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक नवीन सिंग ओबेरॉय यांनी सांगितले महाविकास आघाडीने हि निवडणूक बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. मैदानात उतरुन महायुतीचा मुकाबला केला. देशात काय परिस्थिती आहे सर्वांना माहीत आहे. लोकप्रतिनिधी विकले जात आहे अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने एकजूट दाखवून मतदान केले. राजकीय समीकरण बदलली तर चमत्कार होऊ शकतो. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow