उद्या सिल्लोडकडे येणाऱ्या व जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी मार्गात बदल
 
                                अवजड वाहतुक मार्गात बदल
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.1(डि-24 न्यूज)- सिल्लोड येथे शुक्रवार दि.२ रोजी आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शुभारंभ कार्यक्रमानिमित्त होणारी संभाव्य गर्दी व रहदारी लक्षात घेता शुक्रवार दि.२ रोजी सकाळी १० ते सायं. ७ दरम्यान प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (एफ) या छत्रपती संभाजीनगर ते जळगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अवजड वाहतुक मार्गात खालीप्रमाणे बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिले आहेत.
वाहतुकीतील बदल याप्रमाणे- प्रस्थावित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 (एफ.) छत्रपती संभाजीनगर ते जळगाव कडे जाणारी जड वाहतूक करणार वाहने छत्रपती संभाजीनगर – भोकरदन – अन्वा- शिवना- अंजिठा –मार्गे जळगावकडे जातील.
तर जळगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी जड वाहतूक करणारी वाहने जळगाव- अंजिठा- शिवना-अन्वा - भोकरदन-हसनाबाद- पाल फाटा- फुलंब्री मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे येतील.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            