उध्दव गटाला धक्का, तनवानींची निवडणुकीतून माघार...!
 
                                उध्दव गटाला धक्का, तनवानींची निवडणुकीतून माघार...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.28(डि-24 न्यूज)
आजारपणामुळे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवानी यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता उबाठा गटावर उमेदवार बदलण्याची वेळ आली आहे. बाळासाहेब थोरात, माजी महापौर नंदकुमार घोडेले, डॉ.शोएब हाश्मी, बंडू ओक या मतदारसंघातून इच्छुक होते यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. काँग्रेस कडून शहराध्यक्ष युसुफ शेख हे सुद्धा इच्छुक होते त्यांचाहि उमेदवारी साठी विचार केला जावू शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अशा घडामोडी घडत आहेत.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            