एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांची एसआयआरची जनजागृती करुन कामाचा धडाका सुरू...

 0
एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांची एसआयआरची जनजागृती करुन कामाचा धडाका सुरू...

एमआयएम जिल्हाध्यक्ष यांची एसआयआर जनजागृती करुन कामाला सुरुवात...!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज) - एमआयएमचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शारेक नक्शबंदी यांनी प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या आदेशाने जिल्ह्यात एसआयआरची जनजागृती करुन कामाचा धडाका सुरू केला आहे. त्यांनी दौ-याची सुरुवात फुलंब्री तालुक्यातून केली. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष जावेद पटेल, युवा जिल्हाध्यक्ष इद्रीस नवाब, सोहेल शेख व नायगावचे एमआयएमचे अध्यक्ष मुख्तार पटेल व स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. 

आज शुक्रवारच्या नमाज नंतर शारेक नक्शबंदी यांनी एसआयआरचे महत्व नागरिकांना पटवून दिले. शंभर टक्के मतदारांचे अर्ज बीएलओ यांच्या कडून बीएलएच्या मदतीने अचूक अर्ज भरुन घ्यावे. तो मतदार कोणत्या जाती धर्मातील आहे हे न बघता सर्वांना कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे. काही मतदार गांव, तांड्यात, शेतात वास्तव्यास आहेत त्यांच्यापर्यंत एसआयआरचे अर्ज पोहचवून 8 ऑगस्ट पूर्वी भरुन खात्री करून एका अर्जावर बीएलओची सही घ्यावी. एकाही मतदाराचा मतदार यादीतून नाव वगळले जावू नये याची काळजी घ्यावी अशी जनजागृती जागोजागी बैठक घेवून एमआयएमच्या टिमने आज केली. यानंतर गावातील नागरिकांनी आभार मानले

.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow